ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पुरूष संघाच्या आठव्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान आणि इंग्लंड रविवारी (13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर समोरा-समोर आले. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक गमावली आणि इंग्लंडने त्यांना प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. मागील सामन्यात अर्धशतकी खेळी करणारे पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर अंतिम सामन्यात त्याची पुनरावृत्ती करतील, अशी अपेक्षा असताना दोन्ही लवकरच बाद झाले. यामध्ये बाबर आझम याची विकेट सर्वोत्तम ठरली.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने विकेटकीपर-फलंदाज मोहम्मद रिझवान याला साथीला घेत पाकिस्तानच्या डावाची सुरूवात उत्तम केली. त्यांनी पहिल्याच षटकात 8 धावा केल्या, मात्र रिझवान सॅम करन याचा शिकार ठरला. त्याने त्रिफळाचीत होण्याआधी 14 चेंडूत 15 धावा केल्या. यावेळी इंग्लंडचा फिरकीपटू आदील रशिद (Adil Rashid) याने विलक्षण गोलंदाजी केली. त्याने डाईव्ह मारत बाबरची कॅच पकडली ज्याचा व्हिडिओ आयसीसीने शेयर केला असून तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पाकिस्तानच्या 11व्या षटकात लियाम लिविंगस्टोन याला शान मसूद याने चौकार-षटकार मारले आणि 16 धावा वसूल केल्या. बाबरही हीच लय कायम राखण्याच्या प्रयत्नात होता आणि त्याने पुढच्याच षटकात रशिदविरुद्ध मोठा शॉट खेळला, मात्र रशिदने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याचा उत्तम झेल घेतला. त्याने गुगली टाकत बाबरला फसवले आणि त्यात तो यशस्वी देखील झाला.
बाबर 28 चेंडूत 32 धावा करत तंबूत परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला मोहम्मद हॅरिस हाही याच नादात विकेट गमावून बसला. तो 12 चेंडूत 8 धावा करत रशिदचा बळी ठरला.
या विश्वचषकात रशिदची कामगिरी पाहिली तर तो महत्वाच्या सामन्यात जबरदस्त ठरला आहे. त्याने 4 षटके टाकताना श्रीलंकेविरुद्ध 16 धावा देत एक विकेट आणि भारताविरुद्ध 20 धावा देत सूर्यकुमार यादव याची विकेट घेतली होती. आता पाकिस्तानविरुद्धही त्याने त्याची पुनरावृत्ती केली.
https://www.instagram.com/reel/Ck5TeJMueyP/?utm_source=ig_web_copy_link
या सामन्यात पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा शान मसूद याने केल्या. त्याने 28 चेंडूत 38 धावा केल्याने पाकिस्तानने 20 षटकात 8 विकेट्स गमावत 137 धावसंख्या उभारली. यावेळी इंग्लंडच्या गोलंदाजीत करन सर्वात यशस्वी ठरला. त्याने 4 षटकात 13 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर रशिदचा क्रमांक लागतो. त्याने 4 षटकात 22 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. babar azam caught and bowled by adil rashid in t20 final matach
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषकाचा संघ कसा जाहीर करावा हे उरुग्वेकडून शिका, व्हिडिओ व्हायरल
नेपाळही भूषवणार अंडर 19 विश्वचषकाचे यजमानपद! या देशात ‘यंग इंडिया’ राखणार आपले विश्वविजेतेपद