जसप्रीत बुमराह सध्या जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपेकी एक आहे. त्याची अचूक यॉर्कर फेकण्याची कला त्याला जगातील सर्वोत्तम डेथ ओव्हर्स बॉलर्सपैकी एक बनवते. मात्र आता पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमच्या एक व्यक्तव्यानं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
बाबरला एका पाकिस्तानी पत्रकारानं विचारलं की, जर टी20 सामन्यामध्ये अखेरच्या षटकामध्ये 10 धावा वाचवायच्या असतील तर तो गोलंदाजीसाठी कोणाची निवड करेल, जसप्रीत बुमराह की नसीम शाह? यावर बाबरनं एका झटक्यात उत्तर दिलं – नसीम शाह!
बाबर म्हणाला की तो एका षटकात 10 धावा वाचवण्यासाठी नसीम शाहची निवड करेल. तो म्हणाला, “मला आनंद आहे की नसीम शाहनं दुखापतीतून बरं होत पुनरागमन केलंय. त्याची शैली उत्कृष्ट आहे आणि पाकिस्तानात असे प्रतिभाशाली गोलंदाज फार कमी पाहायला मिळतात. त्याच्याशिवाय शाहीन आफ्रिदीही आहे. त्याची पातळी वेगळी आहे. मात्र नसीम त्याच मार्गावर अग्रेसर आहे. तो खरंच चांगला अनुभव प्राप्त करतोय.”
वेगवान गोलंदाज नसीम शाहकडे गती आहे. तसेच डेथ ओव्हर्समध्ये त्याचे आकडे जसप्रीत बुमराहपेक्षा चांगले आहेत. त्यामुळे पाकिस्तानात या दोघांची तुलना केली जाते. मात्र नसीम शाह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवखा असून त्यानं अद्याप 100 विकेटही घेतलेल्या नाहीत. 21 वर्षीय नसीम शाहनं 19 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 15 बळी घेतले आहेत. तर त्याच्या नावे 14 एकदिवसीय सामन्यांमध्ये 32 आणि 17 कसोटी सामन्यांमध्ये 51 बळी आहेत.
दुसरीकडे, बुमराहच्या नावे आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 382 विकेट्स आहेत. याशिवाय बुमराहकडे वर्ल्ड कप सारख्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात बुमराहनं 11 सामन्यांमध्ये 20 बळी घेतले होते. मोहम्मद शमीनंतर भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज होता. त्यामुळे अनुभवाच्या बाबतीत बुमराह निश्चितच नसीम शाहपेक्षा वरचढ ठरतो.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल 2024 मध्ये एका सामन्यात 5 बळी घेणारा पहिला गोलंदाज, जाणून घ्या कोण आहे विदर्भाचा यश ठाकूर?
एड शीरननं विचारलं, “तुला गर्लफ्रेंड आहे का?”; शुबमन गिलनं दिलेलं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल!