---Advertisement---

एड शीरननं विचारलं, “तुला गर्लफ्रेंड आहे का?”; शुबमन गिलनं दिलेलं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल!

---Advertisement---

आयपीएलचा ज्वर आता जगभरात पोहचला आहे. सध्या आयपीएलचा 17 वा हंगाम खेळला जात आहे. या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध गायक एड शीरन यानं भारतात नुकतीच एक कॉन्सर्ट केली. या दरम्यान त्यानं टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू शुबमन गिलची भेट घेतली. शीरन आणि गिलसोबत लोकप्रिय युट्यूबर तन्मन भटही दिसला.

एड शीरननं शुबमन गिल आणि तन्मय भटसोबतचा एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. शीरननं सहज बोलताना शुबमन गिलला त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव विचारलं. त्यावर गिलनं जे उत्तर दिलं ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

एड शीरननं शुबमन गिलला विचारलं, “तुला गर्लफ्रेंड आहे का?” यावर गुजरात टायटन्सच्या कर्णधारानं हसून उत्तर दिलं – “नाही”. शीरननं यावर प्रतिक्रिया दिली की, हा मुलगा मार्केटमध्ये उपलब्ध आहे, म्हणजेच शुबमन गिल एक एलिजिबल बॅचलर आहे. शीरननं यावेळी सांगितलं की, त्याच्या पत्नीच्या एका मैत्रिणीनं त्याला शुबमन गिलचा एक फोटो दाखवला होता, ज्यामध्ये तो आपले सिक्स पॅक अ‍ॅब्स दाखवत होता. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहू शकता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ed Sheeran (@teddysphotos)

YouTube video player

एड शीरन भारतामध्ये एका कॉन्सर्टसाठी आला होता. त्याच्या कॉन्सर्टचं नाव होतं – मॅथेमॅटिक्स, ज्याचा शेवटचा शो 16 मार्चला मुंबईमध्ये झाला. त्याचवेळी, शुबमन गिल सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. तो गुजरात टायटन्सचं नेतृत्व करतोय. गुजरातनं आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून 3 सामने गमावले आहेत.

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाला आपल्या शेवटच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सकडून 33 धावांनी पराभव पत्कारावा लागला. या पराभवसह टीम आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत 7व्या स्थानी घसरली आहे. गुजरातचा पुढील सामना बुधवारी (10 एप्रिल) राजस्थान रॉल्सविरुद्ध जयपूरमध्ये आहे. राजस्थानची टीम या हंगामात तुफान फार्मात असून त्यांनी आपले पहिले चारही सामने जिंकले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माचा सन्मान, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यानंतर मिळाला स्पेशल अवार्ड

शुबमन गिलची बॅटिंग पाहण्यासाठी हे छोटे चाहते चक्क 12 हजार किलोमीटरचा प्रवास करून आले!

यश ठाकूर-क्रुणाल पांड्याचा जलवा! लखनऊचा गुजरातवर शानदार विजय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---