IPLक्रिकेटटॉप बातम्या

मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माचा सन्मान, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यानंतर मिळाला स्पेशल अवार्ड

रोहित शर्मानं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रविवारी (7 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा केल्या. रोहितनं 27 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 49 धावांची खेळी खेळली. मुंबई इंडियन्सकडून या सामन्यात एकही खेळाडू 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करू शकला नाही. परंतु तरीही संघानं निर्धारित 20 षटकांत 234 धावांचा डोंगर उभा केला.

मुंबईकडून सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी 7 षटकांमध्ये 80 धावा जमवल्या. यानंतर टीम डेव्हिड आणि रोमारिओ शेफर्ड यांनी अखेरच्या षटकांमध्ये धुवांधार फलंदाजी करत मोठा स्कोअर उभारला. ईशान किशन 42 धावा करून बाद झाला. टीम डेव्हिडनं नाबाद 42 आणि रोमारिओ शेफर्डनं नाबाद 39 धावा केल्या. शेफर्डनं अवघ्या 10 चेंडूत 39 धावा ठोकल्या. त्यानं अ‍ॅनरिक नॉर्कियाच्या शेवटच्या षटकात 32 धावा ठोकून मुमेंटम मुंबईकडे शिफ्ट केलं. या खेळीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्कारानंही गौरवण्यात आलं.

त्याच वेळी, मुंबई इंडियनसच्या ड्रेसिंग रुमबद्दल बोलायचं झालं तर, इथे सामनावीराचा पुरस्कार रोहित शर्माला देण्यात आला. रोहित शर्मानं पुरस्कार मिळाल्यानंतर संघाच्या फलंदाजीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या, याशिवाय त्यानं टीमचे फलंदाजी प्रशिक्षक मार्क बाऊचर आणि कर्णधार हार्दिक पांड्या यांना संघाकडून काय अपेक्षित आहे, हे देखील सांगितलं.

रोहित शर्मानं पुरस्कार जिंकल्यानंतर एक छोटेखानी भाषण दिलं. रोहित म्हणाला, “मला वाटतं की आपण शानदार फलंदाजीचं प्रदर्शन केलं. हे असं आपण पहिल्या सामन्यापासून करण्याच्या प्रयत्नात होतो. यामुळे हे दिसून येतं की, जर संपूर्ण संघानं जबाबदारी घेतली नाही तर व्यक्तीगत कामगिरीचा काहीच उपयोग होत नाही. बॅटिंग युनिटनं एकत्र जबाबदारी घेतली आणि संघाबद्दल विचार केला, तर आपण अशाप्रकारचा स्कोर उभा करू शकतो. ही कामगिरी पाहून फार छान वाटलं. पुढेही आपण असंच प्रदर्शन करत राहू”

 

महत्त्वाच्या बातम्या-

शुबमन गिलची बॅटिंग पाहण्यासाठी हे छोटे चाहते चक्क 12 हजार किलोमीटरचा प्रवास करून आले!

हार्दिक पांड्यानं अखेर विजयाची चव चाखली! दिल्लीचा 29 धावांनी पराभव

आयपीएलमध्ये 49 धावांवर सर्वाधिक वेळा बाद होणारा फलंदाज, रोहित शर्माच्या नावे नकोसा रेकॉर्ड

Related Articles