आशिया चषक २०२२ ही स्पर्धा अगदी तोंडावर आहे. अशा परीस्थितीत पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू आशिया चषकात खेळाणार की नाही या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यावर आता खुद्द पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमनेच स्पष्टी करण दिले आहे.
शोएब मलिक टी-२० विश्वचषक २०२२ साठी पाकिस्तान क्रिकेट संघात परतणार का? यावर कर्णधार बाबर आझमने सडेतोड उत्तर दिले आहे. बाबर म्हणाला की, “संघाने युवा क्रिकेटपटूंना अधिक संधी देण्याची गरज आहे.” बाबर आझमच्या या उत्तरावरून पाकिस्तानी क्रिकेट संघाचे दरवाजे आता वरिष्ठ खेळाडूंसाठी बंद झाल्याचे संकेत मिळत आहेत. शोएब मलिकने गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्ध शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय खेळला, परंतु त्यानंतर त्याने देशांतर्गत टी-२० लीगमधील कामगिरीने खूप प्रभावित केले आहे.
स्थानिक मीडियासोबतच पाकिस्तानच्या काही माजी क्रिकेटपटूंचेही मत आहे की, शोएब मलिकची यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघात निवड करावी. याबाबत बाबर आझमला विचारले असता तो म्हणाला की, “नेदरलँड दौऱ्यानंतर लगेचच सामने खेळवायचे असतील तर संघात कोणतेही बदल करणे कठीण आहे. वरिष्ठ खेळाडू संघातून बाहेर पडतात तेव्हा त्यांची जागा घेणाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे.”
बाबर पुढे म्हणाला की, “मोहम्मद हाफीज आणि शोएब मलिक ही मोठी नावे आहेत आणि आम्हाला त्यांची खूप आठवण येते, परंतु आसिफ अली, खुशदिल शाह आणि इफ्तिखार अहमद यांना त्यांची जागा भरावी लागेल. आम्हाला त्यांना जास्तीत जास्त सामने खेळण्याची संधी द्यायची आहे, जेणेकरून त्यांना आत्मविश्वास मिळेल आणि हे सर्व खेळाडू मैदानावर चांगली कामगिरी करतील.”
दरम्यान, सध्या पाकिस्तान संघ रॉटरडॅम येथे तीन सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. यानंतर संघ दुबईला रवाना होईल, जिथे २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपचा सामना होणार आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी संघाला आगामी काळात अनुभवी खेळाडूंची कमी जाणवणार आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘बीसीसीआयकडून काहीतरी शिका’; पाकिस्तानी दिग्गजाचा पीसीबीला घरचा आहेर
भारतीय समजून अभद्र शब्द वापरायचे आपलेच संघ सहकारी, ‘या’ किवी खेळाडूने मांडली व्यथा
झिम्बाब्वे दौऱ्यावर बीसीसीआयचा ‘हा’ एक डाव पडू शकतो भारी, गमवावी लागेल वनडे मालिका!