---Advertisement---

‘बीसीसीआयकडून काहीतरी शिका’; पाकिस्तानी दिग्गजाचा पीसीबीला घरचा आहेर

On: शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022 5:16 PM
---Advertisement---

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. हा सामना २८ ऑगस्ट रोजी दुबईच्या त्याच मैदानावर खेळवला जाईल, जिथे गेल्या वर्षी टी२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी म्हटले होते की, बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ मजबूत दिसत आहे. मात्र, पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरिया सध्या आपल्याच देशाच्या संघावर खूश नाही. आपल्या युट्युब चॅनेलवर बोलताना त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावरही सडकून टीका केली आहे.

कनेरिया सातत्याने आपल्या युट्युब चॅनेलवर बोलताना क्रिकेटविश्वातील अनेक मुद्द्यांवर परखडपणे आपली प्रतिक्रिया मांडत असतो. नुकतेच त्याने बोलताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व पाकिस्तान क्रिकेट बोर्डाविषयी आपले मत व्यक्त केले. कनेरिया म्हणाला,

“पीसीबी फक्त वर्तमानावर लक्ष केंद्रित करत आहे. दुसरीकडे, बीसीसीआय भविष्याचा विचार करत आहे आणि अधिकाधिक तरुण खेळाडूंना संधी देत ​​आहे. गेल्या वर्षीच्या टी२० विश्वचषकानंतर पाकिस्तानने फार कमी टी२० सामने खेळले आहेत. पाकिस्तानने या काळात सात सामने खेळले असून सहा जिंकले आहेत. यादरम्यान पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या संघाशी झाला. जेथे आपल्याला पराभूत व्हावे लागले. त्याचबरोबर भारतीय संघाने पाकिस्तानपेक्षा जास्त सामने खेळले आहेत. त्यातील जास्तीत जास्त सामने ते ब किंवा क संघासह खेळले, तरीही त्यांना विजय मिळाला होता.”

आशिया चषकात भारताला पाकिस्तानशी दोन वेळा भिडण्याची संधी असेल. साखळी फेरीतील लढत २८ तारखेला होईल. तर सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा हे संघ आमने-सामने येतील. तसेच सर्व गोष्टी योग्य जुळून आल्या तर, या दोन्ही संघांमध्येच अंतिम सामना देखील पाहायला मिळू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतासाठी कर्दनकाळ ठरू शकतात झिम्बाब्वेचे ‘हे’ दोघे खेळाडू, एकट्याने ठोकलीत सलग २ शतके

‘भारताविरुद्ध सामना खेळताना दबाव असतो!’ पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने केले स्पष्ट

आशिया चषकापूर्वी सूर्यकुमार यादवने घेतली लक्झरी कार, किंमत ऐकुण तुम्हीही व्हाल हैरान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---