पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझमचा वाईट काळ संपण्याची लक्षण दिसत नाहीत. ‘किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाबर आझमचा फ्लॉप शो जवळपास दोन वर्षांपासून सुरू आहे. घरच्या मैदानावर दुबळ्या बांग्लादेशविरुद्ध खेळतानाही बाबरला धावा करता आल्या नाहीत. परिणामी आता त्याच्यावर सोशल मीडियासह सर्वत्र जोरदार टीका होत आहे.
बांग्लादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बाबरने 0(2), 22(50), 31(77) आणि 11(18) धावा केल्या. चार डावांत त्याच्या बॅटमधून 16 च्या सरासरीने केवळ 64 धावा झाल्या आहेत. याआधी बाबर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धही धावा करण्यासाठी झगडताना पाहायला मिळाला होता.
Heartbreaking pictures for Pakistan fans💔
Babar Azam has scored just 64 runs in the ongoing Test series against Bangladesh.
📸: A Sports pic.twitter.com/4dxWT9eWds
— CricTracker (@Cricketracker) September 2, 2024
दरम्यान आश्चर्याची बाब म्हणजे बाबर आझमने कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावून 616 दिवस झाले आहेत. त्याला जवळपास 20 महिन्यांत एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. बाबरची कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी खरोखरच आश्चर्यकारक आहे. शेवटच्या वेळी त्याच्या बॅटमधून 2022 मध्ये धावा झाल्या होत्या. तेव्हापासून बाबरची बॅट 16 डावांपर्यंत शांत आहे.
बाबर आझमने डिसेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 161 धावांची खेळी खेळली होती. त्यानंतर त्याच्या कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या केवळ 41 धावांची आहे. बाबर इतर फॉरमॅटमध्ये धावा करतो असे नाही. गेल्या दोन वर्षांपासून बाबर प्रत्येक फॉरमॅटमध्ये धावा काढण्यासाठी धडपडत आहे.
एकेकाळी जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहलीही धावा काढण्यासाठी धडपडत होता. त्यानंतर त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आणि परत (कमबॅक) करताना त्याने नेत्रदीपक कामगिरी केली. बाबर आझमनेही विराटकडून शिकावे आणि क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घ्यावी. कोहलीने नंतर खुलासा केला की, ब्रेक दरम्यान त्याने बॅटला हातही लावला नव्हता.
हेही वाचा-
लॉर्ड्स मैदानावर शतक आणि 5 बळी घेणारे 3 खेळाडू, मानाच्या यादीत एका भारतीयाचाही समावेश
‘विराट कोहली’ समोर बाबर आझम फेलचं! पाकिस्तानी खेळाडूनेच दाखवला आरसा
आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ‘पुजारा’ आणि ‘रहाणे’ची जागा कोण घेणार?