संयुक्त अरब अमिरातीत (युएई) होणाऱ्या आशिया चषक २०२२ ची सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. २७ ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी दुबईच्या मैदानावर भारताविरुद्ध पाकिस्तान संघ त्यांच्या आशिया चषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याच्या दुखापतीने पाकिस्तान संघाच्या अडचणी वाढवल्या आहेत. आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने आफ्रिदीच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले आहे.
आफ्रिदीला (Shaheen Afridi) नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान दुखापत (Shaheen Afridi Injury) झाली होती. याच कारणामुळे त्याला दुसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यातून बाहेर पडावे लागले होते. यानंतर आता पाकिस्तानचा संघ १८ ऑगस्ट्पासून नेदरलँड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी आझमने आफ्रिदीच्या दुखापतीविषयी अपडेट (Shaheen Afridi Injury Update) दिले आहे.
टी२० विश्वचषक २०२१ मध्ये पाकिस्तानकडून ७ विकेट्स घेणारा आफ्रिदी दुखापतीतून पूर्णपणे सावरू शकलेला नाही. तरीही त्याला पाकिस्तान संघासोबत नेदरलँड दौऱ्यावर नेले जाईल, जेणेकरून डॉक्टर आणि फिजिओ त्याच्या दुखापतीवर नजर ठेवू शकतील.
आफ्रिदीच्या दुखापतीबद्दल काय म्हणाला आझम
नेदरलँड दौऱ्यापूर्वी पत्रकार परिषदेत आझम (Babar Azam) म्हणाला की, “आफ्रिदीची फिटनेस चिंतेचा विषय बनली आहे. आम्ही त्याला नेदरलँड दौऱ्यावर संघासोबत घेऊन जात आहोत, कारण पाकिस्तान संघाचे डॉक्टर आणि फिजिओ संघासोबत नेदरलँडला यात्रेवर जाणार आहेत. त्यामुळे तिथे त्याच्या दुखापतीवर लक्ष देता येईल. आम्ही भविष्यातील आशिया चषक आणि टी२० विश्वचषक डोक्यात ठेवून योजना बनवत आहोत.”
तसेच आझम पुढे म्हणाला की, “आम्ही हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत आहोत की, तो लवकरात लवकर बरा होईल. आम्हाला अपेक्षा आहे की, तो नेदरलँड दौऱ्यात कमीत कमी एकतरी सामना खेळेल. जर तो नेदरलँडविरुद्ध खेळूच शकला नाही, तर त्याच्या आशिया चषकात खेळण्याची अपेक्षा आहे.”
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पत्रकाराने निवृत्तीवरून विचारला प्रश्न; चिडलेला बाबर आझम म्हणाला, ‘मी म्हातारा वाटतोय..’
वाद चिघळला! पंतच्या कमेंटवर उर्वशी रौतेलाचे प्रत्युत्तर; म्हणाली, ‘छोटू भैया, मी बदनाम व्हायला..’
हंड्रेड लीगच्या ‘वंडर बॉय’ स्मिडला लागली लॉटरी; ‘एमआय फॅमिली’ने दिली ही ऑफर