पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड (Pakistan vs England) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. दोन्ही संघ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी (15 ऑक्टोबर) रोजी आमने-सामने असणार आहेत. हा सामना मुल्तानच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी पाकिस्तान-इंग्लंड (Pakistan vs England) दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पाकिस्तानने आपला स्टार फलंदाज बाबर आझमला (Babar Azam) संघातून वगळले होते. आता इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात बाबरच्या जागी कामरान गुलाम (Kamran Ghulam) खेळताना दिसणार आहे. कामरान दुसऱ्या सामन्यात कसोटी पदार्पण करेल आणि बाबरच्या जागी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण कामरान गुलाम कोण आहे? ज्यावर पाकिस्तानी निवड समितीने विश्वास व्यक्त केला आहे. हे जाणून घेऊया.
पाकिस्तान संघाकडून आगामी सामन्यात कसोटी पदार्पण करणारा कामरान हा प्रथम श्रेणी क्रिकेटचा अनुभवी फलंदाज मानला जातो. त्याने आतापर्यंत 59 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 16 शतके आणि 20 अर्धशतकांच्या मदतीने 4,377 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची फलंदाजी सरासरी 50च्या आसपास आहे.
Kamran Ghulam practicing hard in Multan today, he has replaced Babar Azam in the Test squad 🇵🇰🔥
Best wishes to him, he has scored tons of runs in domestic cricket and deserved his chance ❤️ #PAKvENG pic.twitter.com/Aq78OsOXkA
— Farid Khan (@_FaridKhan) October 13, 2024
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा केली. दरम्यान निवड समितीने धक्कादायक निर्णय घेत स्टार खेळाडू बाबर आझम (Babar Azam), शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) आणि नसीम शाह (Naseem Shah) या खेळाडूंना संघातून वगळले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 खेळाडू
INDW vs NZW; एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक जाहीर…!
IND vs NZ; कसोटी मालिकेपूर्वीच गंभीर बनला कोहलीची ढाल! म्हणाला…