---Advertisement---

पहिलाच टी२० विश्वचषक बाबर आझमसाठी खास! विराट, हेडन सारख्या दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान

On: शुक्रवार, नोव्हेंबर 12, 2021 1:52 AM
babar-azam
---Advertisement---

टी२० विश्वचषक २०२१ चा दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला गेला. पाकिस्तानने २० षटकात ४ गडी गमावून १७६ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७७ धावांचे लक्ष्य मिळाले. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक ६७ आणि फखर जमानने नाबाद ५५ धावा केल्या. कर्णधार बाबर आझमने ३९ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने एक विक्रम नोंदवला आहे.

आपल्या पहिल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत बाबर आझमने ३०३ धावा केल्या आहेत. पदार्पणातच सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता बाबरच्या नावे झाला आहे. या आधी हा विक्रम मॅथ्यू हेडनच्या नावे होता. त्याने २००७ च्या विश्वचषकात २६५ धावा केल्या होत्या. तिसऱ्या स्थानी जो रूट आहे त्याने२०१६ च्या विश्वचषक स्पर्धेत २४९ धावा केल्या होत्या. बाबर आझमचा सहकारी मोहम्मद रिझवान सध्या चौथ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत २४५ धावा केल्या आहेत.

याशिवाय बाबर आझम विश्वचषक स्पर्धेच्या एका पर्वात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ३०३ धावा करून तो तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर विराट कोहली आहे. त्याने २०१४ सालच्या विश्वचषक स्पर्धेत ३१९ धावा केल्या होत्या. दुसऱ्या स्थानी श्रीलंकेचा दिलशान आहे. त्याने २००९ च्या विश्वचषक स्पर्धेत ३१७ धावा केल्या होत्या.

दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. बाबरला ३९ धावांवर ऍडम झाम्पाने झेलबाद केले. त्याने ३४ चेंडूत ५ चौकार मारले. यानंतर रिझवानने फखर जमानसोबत डाव पुढे नेत दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. रिझवानने ६७ धावा केल्या. तो मिचेल स्टार्कच्या चेंडूवर झेलबाद झाला. फखर जमानने नाबाद ५५ धावा केल्या. पाकिस्तानने २० षटकात ४ गडी गमावून १७६ धावा केल्या.

यानंतर १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने १९ षटकांत ५ विकेट्स गमावत पूर्ण केला आणि सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने ४९ धावांची खेळी केली. तसेच मार्कस स्टॉयनिसने ४० आणि मॅथ्यू वेडने ४१ धावांची नाबाद खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या –

उपांत्य सामन्यात इंग्लडला पुरून उरणारा न्यूझीलंडचा सलामीवीर डॅरिल मिशेल आहे तरी कोण?

Video: जेम्स निशम नावाच्या वादळाने इंग्लंडचा तोंडचा घास घेतला हिरावून, पाहा सामन्याला कलाटणी देणारा क्षण

न्यूझीलंड-इंग्लंड सामन्यात असं काय झालं की, समालोचकाला आठवला एमएस धोनी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---