पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम एकमात्र फलंदाज आहे, ज्याने आशिया चषक स्पर्धेत शतक ठोकले आहे. परंतु, हेदेखील जाणून घ्या की, आपण या लेखात टी-२० फॉरमॅटमध्ये खेळल्या गेलेल्या आशिया चषकाचा विचार करत आहोत. क्रिकेटच्या जाणकारांना ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहिती आहे की, आशिया चषक दोन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये खेळला जातो. आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा विश्वचषक टी-२० प्रकारात खेळला जात आहे.
आशिया चषकाचा इतिहास ३९ वर्ष जुना आहे. परंतु एवढ्या मोठ्या काळात ही फक्त दुसरीच वेळ आहे, जेव्हा ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळली जात आहे. २०१६ मध्ये आशिया चषक (Asia Cup) पहिल्यांदा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळला गेला होता, जो भारताने नावावर केलेला. आपण या लेखात बाबर आझम (Babar Azam) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या आशिया चषकातील प्रदर्शनाची माहिती घेत आहोत.
आशिया चषकात शतक करणारा एकमात्र फलंदाज आहे बाबर आझम –
बाबर आझम एकमात्र असा फलंदाज आहे, ज्याने आशिया चषकाच्या टी-२० फॉरमॅटमध्ये शतक केले आहे. त्याने ओमान संघाविरुद्ध खेळताना ६० चेंडूत १२२ धावांची सर्वात मोठी खेळी केली होती. बाबर आशिया चषकाच्या टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे. त्याने २०१६ साली खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत एकूण १९४ धावा केल्या. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता यावर्षीच्या हंगामात देखील त्याच्याकडून अशाच प्रकारच्या प्रदर्शनाची अपेक्षा चाहत्यांना आहे.
बाबर आझम त्याच्या सर्वोत्तम फॉरममध्ये असला, तरी रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या फलंदाजांनी चांगले प्रदर्शन करावे, अशी इच्छा भारतीय चाहत्यांची असेल. तसे बाबर आणि विराटची नेहमीच तुलना होत आली आहे. आशिया चषकातील सर्वात मोठी खेळी, विराटच्याच नावावर आहे. त्याने २०१२ साली पाकिस्तानविरुद्ध खेळताना १८३ धावांची धमाकेदार खेळी केली होती. आशिया चषकाच्या टी-२० फॉरमॅटमध्येही विराटने चमकदार कामगिरी केली आहे.
विराट आशिया चषक २०१६ हंगामात चार वेळा फलंदाजीसाठी आला आणि संघासाठी सर्वाधिक म्हणजेच १५३ धावांचे योगदान दिले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट ११० आणि सरासरी ७६.५० होती. या हंगामात त्याने २० चौकार मारले आहेत. पण षटकारांच्या बाबरतीत मात्र तो मागे पडल्याचे दिसते. विराटने या आशिया चषकाच्या टी-२० फॉरमॅटमध्ये अद्याप एकही षटकार मारला नाहीये. आशात विराट यावर्षी हा षटकारांचा दुष्काळ संपवेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. त्याने मागच्या काही मालिकांमध्ये विश्रांती घेतल्यामुळे पूर्ण जोमाने मैदानात पुनरागमन करेल, असे सर्वांना वाटत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘त्याला कोरोना झालाच नाही, हे तर फक्त…’; शास्त्री गुरूजींचे अजब विधान
नशिब फुटकं ते फुटकंच! प्लेइंग ११ मध्ये संधी न मिळाल्याने माजी दिग्गजाने बीसीसीआयला झापलं
विराट की बाबर! आशिया चषकात कोण ठरणार सर्वोत्तम? जाणून घ्या आकडेवारी