मुंबई । पाकिस्तान क्रिकेट संघातील युवा खेळाडू बाबर आझमने आपल्या खेळीने साऱ्यांनाच प्रभावित केले आहे. क्रिकेटच्या तीनही प्रकारात तो धावांचा रतीब घालत आहे. बाबर आझममध्ये असलेली धावांची भूक पाहून पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू त्याची तुलना भारतीय कर्णधार विराट कोहलीशी करत आहेत.
काही दिवसांपूर्वी बाबर आझमने, त्याला विराट कोहलीसारखे बनायचे असल्याची प्रतिक्रिया दिली होती. क्रिकेटमध्ये विराट सारखा प्रवास करण्यासाठी अजून प्रचंड मेहनत घ्यावी लागणार असल्याचेही त्याने म्हटले होते. पण असे असले तरी नुकतेच क्रिकबझच्या मुलाखतीत क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेशी बोलताना बाबर आझमने रोहित शर्माबरोबर सलामीला खेळायला आवडेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.
यासोबत हर्षा भोगले यांनी बाबर आझमला भारत आणि पाकिस्तान संघातील खेळाडू मिळून टी२० चा सर्वोत्तम ११ जणांचा संघ निवडण्यास सांगितले. बाबरने त्याच्या संघात पाच पाकिस्तानी खेळाडूंना स्थान दिले. त्यात त्याच्यासह शोएब मलिक, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद आमीर या खेळाडूंचा समावेश आहे.
तसेच त्याने भारतीय खेळाडूंपैकी सलामीला रोहितला स्थान दिले आहे. त्यामुळे त्याची आणि रोहितची सलामी जोडी असेल. तसेच तिसर्या क्रमांकासाठी त्याने विराट कोहलीची निवड केली आहे. याबरोबरच यष्टीरक्षक म्हणून एमएस धोनीची निवड केली. हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि जसमीत बुमराह यांनाही त्याने संघात स्थान दिले आहे.
बाबर काही दिवसांपूर्वी विराट विषयी बोलताना म्हणाला होता की, ” मी विराटला जगातला सर्वोत्तम क्रिकेटपटू मानतो. त्यांच्याकडून खूप काही शिकण्याचा प्रयत्न करतो. मी अजून खूप मागे आहे. माझी तुलना इतर खेळाडूंबरोबर व्हावी, म्हणून मी कामगिरी करत नाही. मी माझ्या संघाला आणि क्रिकेटप्रेमींना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो. चांगली कामगिरी करून माझ्या क्रिकेट फॅन्सला आनंद देऊ इच्छितो. तसेच संघाच्या विजयात योगदान देण्याचा प्रयत्न करतो.”
ट्रेंडिंग घडामोडी –
…म्हणून हरभजन सिंगने मागितली देशभरातील डॉक्टरांची माफी
दारुच्या नशेत असा करतात भांगडा! मनदीप सिंगचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल
विराट कोहली ‘या’ गोष्टीत आहे मास्टर ब्लास्टरच्या २ पाऊले पुढे, घ्या जाणून