भारत आणि पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्यासाठी दोन्ही देशातील चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका होत नाहीये. त्यामुळे हे दोन्ही संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमने सामने येत असतात. आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात पाकिस्तान संघाने १० गडी राखून विजय मिळवला होता.
दरम्यान, नाणेफेक सुरू असताना बाबर आजम आणि विराट कोहली जेव्हा आमने सामने आले होते. त्यांच्यात काय चर्चा झाली होती. याचा खुलासा आता बाबर आजमने केला आहे.
भारतीय टी२० संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम हे दोघेही अप्रतिम फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाजांच्या नावे अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद आहे. त्यामुळे दोन दिग्गज फलंदाज जेव्हा आमने सामने येतात त्यांच्यात काय चर्चा होते, हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं.
भारत-पाकिस्तान सामन्यात नाणेफेक सुरू होण्यापूर्वी बाबर आजम आणि विराट कोहली यांच्यात काय संवाद झाला होता, याबाबत जेव्हा बाबर आजमला विचारण्यात आले, त्यावेळी तो म्हणाला की, “मी सर्वांसमोर याचा खुलासा करू शकत नाही..”
तसेच भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पाकिस्तान संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भरतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली होती. रिषभ पंतने ३९ आणि रवींद्र जडेजाने १३ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाला २० षटक अखेर ७ बाद १५१ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून मोहम्मद रिजवानने सर्वाधिक ७९ आणि बाबर आजमने ६८ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाने १० गडी राखून विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या :
करारा जवाब! टीकाकारांची तोंडे बंद करत वॉर्नरने पटकावला ‘हा’ मानाचा पुरस्कार
कपिल देव यांची १९८३ विश्वचषकातील इंग्रजी ऐकून व्हाल लोटपोट, पाहा व्हिडिओ
दुसऱ्या ऍशेस सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, संघातील दिग्गज गोलंदाज झाला बाहेर