सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीगचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मुलतान सुलतान्स संघाने सलग तिसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारलीये. त्याचवेळी एलिमिनेटर सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम हा उतरेल. मात्र, या महत्त्वाच्या सामन्याआधी त्याने एका मुलाखतीत असे काही वक्तव्य केले आहे, ज्यामुळे तो भारतातील नेटीझन्सच्या चांगलाच निशाण्यावर आला.
बाबर याने नुकतीच एका पाकिस्तानमधील न्यूज चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये त्याला तुला आयपीएल आवडते की बिग बॅश लीग आवडते? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने अजिबात वेळ न घेता बिग बॅश असे उत्तर दिले. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या या काहीशा कठीण असल्याने आपण बिग बॅश असे म्हटल्याचे त्याने स्पष्टीकरण दिले. त्यानंतर भारतातील चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याची चांगलीच खिल्ली उडविली.
एका ट्विटर वापरकर्त्याने लिहीले,
If you can't reach out for the grapes then they are sour.
We can understand @babarazam258
— Aritra Ghosh (@IamAritraG) March 16, 2023
‘कोल्ह्याला द्राक्ष कायमच आंबट लागतात!’
Saw his Masterclass in Australian conditions during the WT20 🤣😂.
— Ankit 🇵🇸🍉🏳️🌈 (@cricholic90) March 16, 2023
दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले,
IPL ke baare me bol nahi sakta, aawam se jo joote padenge uski koi ginti nahi hai.
— Ayush (@watchescricket) March 16, 2023
‘तू ऑस्ट्रेलियात किती भारी खेळला आहे हे आम्ही विश्वचषकात पाहिले आहे’ अन्य एकाने लिहिले, ‘तू आयपीएलचे नाव घेतले तर तुझ्या देशातील लोक तुला जोड्याने मारतील.’
पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी नाही. 2008 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या हंगामातच केवळ पाकिस्तानी क्रिकेटपटू सहभागी झाले होते. त्यानंतर मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जगभरातील इतर सर्व देशातील क्रिकेटपटू आयपीएल खेळतात. तसेच, आयपीएलला सर्वोत्तम टी20 लीग असल्याचे सांगत असतात.
(Babar Azam Said Big Bash League Better Than IPL Netizens Slams)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केएल राहुल की केएस भरत, कुणाला मिळणार डब्ल्यूटीसी फायनल खेळण्याची संधी?
आरसीबीला पहिला विजय मिळवून देणारी कनिका आहे तरी कोण? वनडेत ठोकलय चक्क त्रिशतक