पाकिस्ताननं इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. शान मसूदच्या नेतृत्वाखालील संघात नवीन खेळाडूंना स्थान मिळालं. विशेष म्हणजे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि सरफराज अहमद यांना मोठा धक्का दिला. पीसीबीनं या चार खेळाडूंची संघातून हकालपट्टी केली आहे. सरफराज मुख्य संघाचा भाग नव्हता. तो राखीव खेळाडू म्हणून आला होता.
पीसीबीनं आपल्या अधिकृत वेबसाइटवर बाबर आणि शाहीनबाबत प्रतिक्रिया दिली आहे. बोर्डानं लिहिलं की, “निवडकर्त्यांनी बाबर आझम, नसीम शाह, सरफराज अहमद आणि शाहीन आफ्रिदी यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. अबरार अहमद अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे तो निवडीसाठी उपलब्ध नव्हता.”
बाबर, शाहीन, नसीम आणि सरफराज यांच्या जागी पीसीबीनं चार नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. हसीबुल्लाह, मेहरान मुमताज, कामरान गुलाम आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद अली हे ते 4 खेळाडू असल्याचं बोर्डानं सांगितलं. त्यांच्यासोबतच ऑफस्पिनर साजित खानलाही संघात स्थान मिळालं आहे. नोमान अली आणि जाहिद महमूद हे पहिल्या कसोटीसाठी मुख्य संघात होते. मात्र या दोघांना रिलिज करण्यात आलं आहे.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ – शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, हसिबुल्लाह (यष्टीरक्षक), कामरान गुलाम, मेहरान मुमताज, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नोमान अली, सैम अयुब, साजिद खान, सलमान अली आगा आणि जाहिद महमूद
हेही वाचा –
आयपीएल मेगा लिलावाबाबत मोठी अपडेट! या सुंदर शहरात होऊ शकतं लिलावाचं आयोजन
या रणजी खेळाडूंना लवकरच मिळू शकते टीम इंडियामध्ये जागा, एकाचं स्थान जवळपास पक्कं!
माजी कर्णधारासह दिग्गज गोलंदाजाला रिलिज करण्याच्या मूडमध्ये सनरायझर्स हैदराबाद! या खेळाडूंना करणार रिटेन