बर्मिंगहॅम। बुधवारी(26 जून) आयसीसी क्रिकेट विश्वचषकात 33 वा सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडला. एजबस्टन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने 6 विकेट्सने विजय मिळवून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे.
पाकिस्तानच्या या विजयात बाबर आझमने नाबाद शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. तसेच त्याने खास विक्रमही या सामन्यात केले आहेत. आझमने या सामन्यात 127 चेंडूत 101 धावांची नाबाद शतकी खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार मारले.
त्याचबरोबर आझमने वनडेमध्ये 3000 धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला आहे. त्याने 70 वनडे सामन्यातील 68 व्या डावात खेळताना हा टप्पा पार केला आहे. त्यामुळे तो सर्वात जलद 3000 धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
त्याने हा पराक्रम करताना वेस्ट इंडिजचे महान माजी फलंदाज व्हीव रिचर्ड्स यांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. रिचर्ड्स यांनी 69 डावात 3000 वनडे धावांचा टप्पा पार केला होता. तसेच सध्या सर्वात जलद 3000 वनडे धावा करण्याचा पराक्रम हाशिम अमलाच्या नावावर आहे. त्याने 57 वनडे डावात हा पराक्रम केला होता.
याबरोबरच आझम हा वनडेमध्ये सर्वात जलद 3000 धावा करणारा आशियाई क्रिकेटपटूही ठरला आहे. त्याने हा पराक्रम करताना शिखर धवनला मागे टाकले आहे. शिखरने 72 डावात 3000 वनडे धावा पूर्ण केल्या होत्या. तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. विराटने 74 डावात 3000 वनडे धावांचा टप्पा पार केला होता.
#सर्वात जलद 3000 वनडे धावा करणारे क्रिकेटपटू –
57 डाव – हाशिम अमला
68 डाव – बाबर आझम
69 डाव – व्हीव रिचर्ड्स
72 डाव – गोर्डन ग्रिनिज/ गॅरि कर्स्टर्न/ शिखर धवन/ जो रुट
73 डाव – केन विलियम्सन
74 डाव – क्विंटॉन डीकॉक
75 डाव – विराट कोहली
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–असा भीम पराक्रम करणारा विराट कोहली पहिलाच भारतीय कर्णधार!
–किंग कोहलीने रचला इतिहास; सचिन-लारा सारख्या दिग्गजांनाही टाकले मागे
–विश्वचषक २०१९: न्यूझीलंड-पाकिस्तान सामन्यानंतर अशी झालीत सेमीफायनलची समीकरणे






