आशिया चषक 2023 च्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाने नेपाळ संघाला पराभव केले. या सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने 151 धावांची खेळी करत आपला फॉर्म कायम ठेवला. त्याने 131 चेंडूत 115 च्या स्ट्राईक रेटने 151 धावा केल्या. पाकिस्तान संघने 50 षटकांत 6 विकेट गमावून 342 धावा केल्या. प्रत्युउत्तर नेपाळ संघाला फक्त 104 धावा पर्यंत पोहचता आले. परिणामी नेपाळला 238 धावांनी पराभव स्विकारावा लागला. दरम्यान बाबरने विराट कोहली बद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
स्टार स्पोर्ट्सने आपल्या सोशल मीडीयावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. बाबर आझम (Babar Azam) याने यात विराट कोहली (Virat Kohli) बद्दल वक्तव्य केले आहे. बाबर स्टार स्पोर्ट्स सोबत बोलताना म्हणाला की, “खूप चांगले वाटते जेव्हा कोणी तुम्हच्या बद्दल चांगले बोलतात. ज्या प्रकारे विराट माझ्याबद्दल बोलला आहे ते पाहून खूप बरे वाटले. विराट म्हणाला होता की मी त्याच्या जवळ बोलायला गेलो होतो. जेव्हा विश्वचषक 2019 चालू होत. हो मी गेलो होतो माझ्या मनात काही प्रश्न होते ते मला त्याला विचारायचे होते.”
पुढे बाबर म्हणाला की, “आम्ही भेटलो तेव्हा मला विराटकडून खूप काही शिकायला भेटले . माझ्या मनात खूप सारे प्रश्न होते ते मी त्याला विचारले. त्याने मला सगळ्या प्रशांचे उत्तर दिले. त्यामुळे मला शिकायला खूप काही मिळाले. त्याने मला खूप चांगल्या प्रकारे गोष्टी समजावल्या. यामुळे मला माझ्या खेळात खूप मदत देखिल झाली. आणि या गोष्टी जेव्हा तुम्ही एकदुसऱ्यासाठी करता तेव्हा खूप चांगले वाटते.”
https://twitter.com/StarSportsIndia/status/1697104430242644218?s=20
विराटने आशिया चषक 2022 च्या दरम्यान बाबरबद्दल वक्तव्य केले होते. तो म्हणाला की, “बाबर सध्या जगातील नंबर 1 फलंदाज आहे. त्याने त्याच्या खेळाने खूप प्रभावीत केले आहे. जेव्हा बाबर फलंदाजी करतो तेव्हा मला त्याचा खेळ पाहायला आवडतो. तो सातत्याने चांगली फलंदाजी करत आहे. पाकिस्तनसाठी त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली आहे.”
आशिया चषकात या दिवशी असतील भारत-पाकिस्तान आमने सामने
अशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान 2 ऑक्टोंबरला भिडणार आहेत. यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. यात बाबर आणि विराट दोन्ही फंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. या दोघांना सामन्यात आमने-सामने पाहायला क्रिकेट चाहते खूप उत्सुक आहेत. (babar azam talk about virat kohli)
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: सचिनच्या घराबाहेर प्रहार संघटनेचे तीव्र आंदोलन, आमदार बच्चू कडू स्वतः सहभागी, वाचा संपूर्ण प्रकरण
बांगलादेश अणि श्रीलंका यांच्यात रंगणार आशिया चषकातील दुसरा सामना, पहा संभाव्य प्लेइंग 11