Asia Cup 2023क्रिकेटटॉप बातम्या

बांगलादेश अणि श्रीलंका यांच्यात रंगणार आशिया चषकातील दुसरा सामना, पहा संभाव्य प्लेइंग 11

आशिया चषक 2023 स्पर्धेला सुरवात झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाने नेपाळ संघाला पराभूत करून स्पर्धेचा पहिला सामना आपल्या नावावर केला. आशिया चषक स्पर्धेत गुरुवारी (31 ऑगस्ट) श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवर होणार आहे. श्रीलंका अणि बांगलादेश या दोन संघात नेहमीच स्पर्धात्मक खेळ पहायला मिळतो. अशातच दोन्ही संघ स्पर्धेला विजय मिळवून सुरवात करण्याच्या बेतात असणार आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सामना सुरू होईल.

बांगलादेश अणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या वनडे मालिकेत बांगलादेशला पराभाव स्वीकारावा लागला. आता बांगलादेश आपली ताकद दाखवण्यासाठी उत्सुक आहे. तर दुसरीकडे श्रीलंका त्यांचे विजेतेपद कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. 2022 च्या आशिया चषकात श्रीलंकेने विजेतेपद भूषवले होते. आशिया चषक या वर्षी वनडे प्रकारात खेळवला जात आहे.

खेळपट्टीचा अंदाज
पल्लेकेले येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल. पहिल्या डावाच्या तुलनेत दुसऱ्या डावात फलंदाजी करणे अधिक कठीण असल्याने लक्ष्याचा पाठलाग करणे थोडे कठीण होऊ शकते. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार या विकेटवर प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करू शकतील .

बांगलादेश संभाव्य प्लेइंग 11-
मोहम्मद नईम, तन्झीद हसन, नजमुल हुसेन शांतो, शाकिब अल हसन (कर्णधार). तौहीद हृदयॉय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद आणि शोरफुल इस्लाम.

श्रीलंका संभाव्य प्लेइंग 11-
पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालागे, महिश थेक्षाना, मथिशा पाथिराना आणि कसून राजिथा.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश लाइव्ह स्ट्रीमिंग, टीव्ही आणि मोबाइलवर लाइव्ह कसे पाहायचे
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात होणारा सामना स्टार्स स्पोर्ट्सवर टीव्हीवर पाहता येईल. डिज्नी प्लस हॉटस्टारवर मोबाईलवर याचा मोफत आनंद घेता येईल.

महत्वाच्या बातम्या-  
लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेविड वॉर्नरसोबत लाजिरवाणा प्रकार! प्रायरवेट पार्टमध्ये…
आनंद मैत्रीचा! ‘बेबी एबी’ने आंतरराष्ट्रीय पदार्पण करतात हर्षला तिलक, पाहा तो व्हिडिओ 

 

Related Articles