---Advertisement---

आनंद मैत्रीचा! ‘बेबी एबी’ने आंतरराष्ट्रीय पदार्पण करतात हर्षला तिलक, पाहा तो व्हिडिओ

---Advertisement---

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला बुधवारी (30 ऑगस्ट) सुरुवात झाली. डर्बन येथे सुरू झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी युवा फलंदाज तसेच बेबी एबी नावाने ओळखल्या जाणाऱ्या डेवाल्ड ब्रेविस व युवा अष्टपैलू गेराल्ड कोएत्झे यांनी पदार्पण केले. आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळणाऱ्या ब्रेविस याला आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना मिळालेली कॅप देतानाचा क्षण पाहून, भारताचा युवा फलंदाज तिलक वर्मा याला कमालीचा आनंद झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://twitter.com/mipaltan/status/1696917456164700596?t=q5G5OlOYvww-QIaDSJuOKQ&s=19

मागील दोन वर्षांपासून क्रिकेट वर्तुळात ब्रेविस याचे नाव चांगलेच चर्चेत आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज एबी डीव्हिलियर्स याच्यासारखी फलंदाजी शैली असल्याने त्याला बेबी एबी या नावाने ओळखले जाते. मागील दोन वर्षांपासून तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. मुंबईमध्ये त्याचा साथीदार असलेला तिलक यांनी नुकतेच भारतीय संघासाठी पदार्पण केलेले.

तिलक याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पण यावेळी ब्रेविस याने खास पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. या दोघांची मैत्री किती घट्ट आहे, हे आता व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमधून दिसत आहे. आशिया चषकासाठी श्रीलंकेत असलेल्या तिलक याने टेलिव्हिजनवर ब्रेविस याला आंतरराष्ट्रीय कॅप मिळतानाचे दृश्य पाहिले व आनंद व्यक्त केला. मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

(Tilak Varma Happy After Dewald Bravis International Debute See Video)

महत्वाच्या बातम्या – 
BREAKING! बाबर आझमकडून आशिया चषकाची वादळी सुरुवात, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
महिला क्रिकेटसाठी ईसीबीचा मोठा निर्णय! पुरुष आणि महिला खेळाडूंना एकसमान मॅच फी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---