---Advertisement---

कर्णधारपद सोडूनही बाबर आझमला फलंदाजीत अपयश! खराब रेकाॅर्डची केली नोंद

On: सोमवार, ऑक्टोबर 7, 2024 10:57 PM
---Advertisement---

सध्या पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड (Pakistan vs England) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला कसोटी सामना सोमवार (7 ऑक्टोबर) रोजी मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यात पाकिस्तानने टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 गडी गमावून 328 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमच्या (Babar Azam) नावावर सामन्यादरम्यान खराब रेकाॅर्ड झाला.

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात बाबर आझम (Babar Azam) केवळ 30 धावा करून तंबूत परतला. त्याला ख्रिस वोक्सने एलबीडब्ल्यू बाद केले. बाबरने डिसेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या होत्या. त्यावेळी बाबरने 161 धावांची शानदार खेळी खेळली होती, मात्र त्यानंतर बाबर एकाही डावात 50 धावांचा आकडा गाठू शकला नाही.

बाबरने न्यूझीलंडविरुद्धच्या 161 धावांच्या खेळीनंतर 16 डावात फलंदाजी केली, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 41 राहिली आहे. जी त्याने डिसेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली होती. 2023च्या सुरुवातीपासून बाबर आझमने (Babar Azam) 16 डावात फलंदाजी केल्यानंतर त्याला केवळ 318 धावा केल्या आहेत.

बाबर आझमने (Babar Azam) नुकतेच पाकिस्तानच्या टी20, एकदिवसीय फाॅरमॅटमधून कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. पण राजीनामा दिल्यानंतरही बाबरचा धावांचा दुष्काळ अद्याप तसाच आहे. कारण हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, बाबरने गेल्या 651 दिवसांपासून एकाही कसोटी सामन्यात 50 धावांचा टप्पा ओलांडला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ‘या’ गोलंदाजाने घेतली सर्वाधिक वेळा Hat-Trick! दिग्गजही मागे
IND vs BAN; पदार्पण सामन्यातच केली धारदार गोलंदाजी, श्रेय दिले गौतम गंभीरला
“श्रेय फक्त रोहितलाच इतर कोणालाही नाही” गंभीरबद्दल काय म्हणाला ‘हा’ दिग्गज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---