---Advertisement---

बाबरची होणार कर्णधारपदावरून हकालपट्टी? पीसीबी अनेक मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत

On: गुरूवार, डिसेंबर 22, 2022 7:14 PM
---Advertisement---

पाकिस्तानला इंग्लंड विरुद्ध खेळलेल्या कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. कराची येथे खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने ही मालिका 3-0 ने जिंकली. 2005 नंतर पहिल्यांदा पाकिस्तानात कसोटी दौरा करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाने आक्रमक क्रिकेटचे प्रदर्शन केले. त्याचबरोबर पाकिस्तानवर मायदेशात प्रथमच कसोटी मालिकेत व्हाईट वॉश पत्करण्याची नामुष्की आली. या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याची कसोटी कर्णधार म्हणून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.

बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाच्या हातून कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव देखील पाकिस्तानला त्यांच्याच मैदानावर मिळाला. त्यानंतर टी20 विश्वचषकाआधी इंग्लंडने पाकिस्तान विरुद्ध 7 टी20 सामन्यांची मालिका खेळवली गेली होती. यात देखील पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर इंग्लंडने पाकिस्तानचा टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव केला आणि आता त्यांना ही कसोटी मालिका देखील गमवावी लागली.

संघाच्या या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्याआधी त्यांच्याच अध्यक्षतेखाली संघाचे मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक व बाबर यांची एक बैठक पार पडली. यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची चर्चा झाली.

त्यानुसार सध्यातरी बाबर हा नेतृत्व सोडण्याची शक्यता कमी आहे. मात्र, पुढील वर्षाच्या मध्यात तो नेतृत्व सोडू शकतो. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या 2023-2025 या सायकलमध्ये पाकिस्तान नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात उतरू शकतो. त्याचवेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले सकलेन मुश्ताक हे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांनी स्वतः याबाबत स्वतः सुतोवाच केले. ‌‌

(Babar Azam Will Step Down As Test Captain In Mid 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BANvIND: ‘मॅचविनर’ कुलदीपला बाहेर केल्याने भडकले चाहते, कर्णधार राहुलची लावली क्लास
पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना संघाला विजेतेपद 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---