Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना संघाला विजेतेपद 

पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना संघाला विजेतेपद 

December 22, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Punit Balan-Kedar Jadhav Mega Club Championship Under 19 Cricket Tournament

File Photo


पुणे, 21 डिसेंबर 2022: पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पुनित बालन- केदार जाधव मेगा क्लब 19 वर्षाखालील चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत स्वराज चव्हाण(4-33 व 60धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पीवायसी हिंदु जिमखाना संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा 1गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदु जिमखाना (PYC Hindu Gymkhana) क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या सामन्यात पीवायसीच्या स्वराज चव्हाण(4-33), वरुण चौधरी(2 -21) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजी पुढे प्रथम फलंदाजी करताना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाला 48 षटकात 9बाद 194धावाच करता आल्या. यात ओंकार राजपूतने 73चेंडूत 5चौकार व 1षटकारासह 62 धावांची खेळी केली. त्याला ओम खटावकर नाबाद 43(41,5×4), टिळक जाधव 22, निनाद चौधरी 14 यांनी धावा काढून साथ दिली.

194धावांचे आव्हान पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 47.5षटकात 9बाद 198धावा काढून पूर्ण केले. यात स्वराज चव्हाणने 67चेंडूत 4चौकार व 3षटकारासह 60धावा, तर स्वप्निल शिंदेने 78चेंडूत 8चौकाराच्या मदतीने 48धावा केल्या. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 136चेंडूत 112धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. पण मोक्याच्या क्षणी पीवायसी संघाने 23धावात 4 गडी गमावले व पीवायसी 42.3 षटकात 9बाद 172 असा अडचणीत सापडला. विजयासाठी पीवायसीला 33चेंडूत 25 धावांची आवश्यकता होती. हे आव्हान आर्चिसमन दास( नाबाद 15) व आर्य पानसे(नाबाद 13) यांनी दहाव्या गड्यासाठी 28धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.

स्पर्धेतील विजेत्या पीवायसी हिंदू जिमखाना संघाला करंडक व 70000रूपये तर, उपविजेत्या व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाला करंडक व 30000रूपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत पारितोषिक वितरण आंतराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव, जेटसिंथेसिसचे अध्यक्ष रोहित पोटफोडे आणि संचालक परममित परमार यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 48 षटकात 9बाद 194धावा(ओंकार राजपूत 62(73,5×4,1×6), ओम खटावकर नाबाद 43(41,5×4), टिळक जाधव 22, निनाद चौधरी 14, स्वराज चव्हाण 4-33, वरुण चौधरी 2 -21, कूश पाटील 1-27) पराभुत पीवायसी हिंदू जिमखाना: 47.5 षटकात 9 बाद 198धावा(स्वराज चव्हाण 60(67,4×4,8×6), स्वप्नील शिंदे 48(78, 8×4), आर्चिसमन दास नाबाद 15, आर्य पानसे नाबाद 13, सोहम जमाले 4-26, सक्षम कडलग 2-44, ओंकार राजपूत 2-40); सामनावीर- स्वराज चव्हाण.
पीवायसी संघ 1 गडी राखून विजयी; (PYC Hindu Gymkhana team wins first Punit Balan-Kedar Jadhav Mega Club Championship cricket tournament)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इतर संघांनीही पाकिस्तान दौरा केला पाहिजे! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर आयसीसीची मोठी प्रतिक्रिया
बाबर आझमच्या भावानेच केली त्याची कानउघडणी; म्हणाला, ‘इंग्लंडने तुमचं पितळं उघडं…’


Next Post
Sachin Tendulkar Stumping

Video: तब्बल 24 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत सचिन एकदाच झाला यष्टीचीत, जाणून घ्या कोण होता तो गोलंदाज

KL Rahul & Shakib Al Hasan BANvIND 2nd Test

दुसऱ्या कसोटीत बांगलादेशने जिंकला टॉस, भारताच्या संघात एक बदल; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

FC Goa

एफसी गोवा विजयी हॅटट्रिकच्या शोधात; जमशेदपूर एफसी सलग आठवा पराभव टाळण्याच्या प्रयत्नात

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143