क्रिकेट विश्वात अनेक असे फलंदाज आहेत जे आपल्या एका विशिष्ट शॉटसाठी प्रसिद्ध आहेत. काही फलंदाज आपल्या कव्हर ड्राईव्हसाठी प्रसिद्ध असतात, तर काही फलंदाज अप्पर कट, स्विच हिट अशा हटक्या शॉटसाठी प्रसिद्ध असतात. अशातच आयसीसीने आपल्या ट्विटर हॅण्डलवर क्रिकेट रसिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवणारा पोल आयोजित केला होता ज्यात दशकातील प्रसिद्ध फलंदाजांचा सहभाग होता. या पोलला जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
कोणी मारली बाजी?
आयसीसीने आपल्या ट्विटर हँडलवर उत्कृष्ट कव्हर ड्राइव्ह साठी चाहत्यांना आपले मत विचारले होते. त्यावर जगभरातून एकूण २,६०,१४३ लोकांनी आपले प्रतिसाद नोंदवले. तर त्याचबरोबर बाबर आजम या पाकिस्तानी फलंदाजाने भारतीय कर्णधार विराट कोहली याला पछाडत बाजी मारली. चाहत्यांनी ४६% मत बाबर आजम याला दिले. तर कर्णधार विराट कोहली याला ४५.९% मत मिळाले. अवघ्या ०.१% मुळे विराट कोहली याचा पराभव झाला. या मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ आणि केन विलियमसन यांचा ही समावेश होता.
काही प्रसिद्ध शॉट आणि ते उत्तमपणे खेळणारे खेळाडू:
स्ट्रेट ड्राइव्ह : भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा त्याच्या उत्कृष्ट स्ट्रेट ड्राइव्हसाठी प्रसिद्ध आहे. हा शॉट खेळण्यासाठी आत्मविश्वास आणि सकारात्मक असणे गरजेचे आहे. गोलंदाज जेव्हा तिन्ही स्टंप च्या मध्ये चेंडू टाकतो तेव्हा त्याला सरळ बॅटने सीमारेषेवर चार धावांसाठी खेळले जाते.
अपर कट : हा शॉट ,जेव्हा गोलंदाज बाऊन्सर चेंडू टाकतो तेव्हा खेळला जातो. बाउन्सर चेंडूवर बॅट आकाशाच्या दिशेने वर नेत यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून शॉट खेळला जातो. भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा शॉट खेळण्यासाठी प्रसिद्ध होता.
स्विच हिट : हा शॉट पाहण्यास खूप आकर्षक आहे. उजव्या हाताचा फलंदाज जेव्हा फिरून डाव्या हाताने शॉट खेळतो त्याला स्विच हिट म्हणतात . हा शॉट इंग्लंड संघाचा खेळाडू केविन पीटरसन उत्कृष्ट रित्या खेळत असे.
महत्वाच्या बातम्या:
जो रूटला शंभराव्या सामन्यात विजयाची भेट देण्याची आमची इच्छा आहे, बेन स्टोक्सचे प्रतिपादन
आयपीएल गाजवणाऱ्या एनरिच नॉर्टजेची पाकिस्तानविरुद्ध भेदक गोलंदाजी, पाहा व्हिडिओ
सामन्यासाठी समालोचकांची गरज नाही, एकटा रिषभ पंत पुरेसा, या माजी खेळाडूचे मजेशीर ट्विट