---Advertisement---

“सामन्यासाठी समालोचकांची गरज नाही, एकटा रिषभ पंत पुरेसा”, ‘या’ माजी खेळाडूचे मजेशीर ट्विट

On: रविवार, फेब्रुवारी 7, 2021 12:16 AM
---Advertisement---

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा आपल्या मजेशीर स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतो. मैदानावर काही वेळा संघसहकार्‍यांसोबत त्याचे चाललेले विनोदी संभाषण तर कधी विरुद्ध खेळाडूंसोबत चाललेली स्लेजिंग सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असते. इंग्लंड विरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्यात देखील पंत मजेशीर संभाषण करताना दिसला. पंतच्या या संभाषणाबाबत भारताचे माजी क्रिकेट खेळाडू विनोद कांबळी यांनी ट्विटरवर एक मजेशीर सल्ला दिला आहे.

विनोद कांबळी यांनी ट्विटरवर लिहिले, “या सामन्यासाठी समालोचकांची गरजच नाही. रिषभ पंतचे संभाषण पुरेसे आहे.” कांबळी यांच्या या मजेशीर ट्विटर चाहत्यांनी देखील सहमती दर्शवत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कांबळी यांनी उल्लेख केल्याप्रमाणेच संपूर्ण सामन्यात पंत मजेशीर संभाषण करताना दिसला.

सामन्याच्या पहिल्या दिवशी जो रुट व डॉम सीबली फलंदाजी करत असताना भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर त्यांना गोलंदाजी करत होता. यावेळी पंत काही मजेशीर कॉमेंट्स करत होता. स्टम्प माइक मध्ये आलेल्या आवाजानुसार पंत म्हणाल ,”मेरा नाम है वॉशिंग्टन मुझे जाना है डीसी.” पंत रविचंद्रन अश्विनला देखील सल्ला देत म्हणाला,”उधर से फसेगा तो मजा आयेगा,इधर से जायेगा तो दिक्कत पायेगा.” पंतचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असून, क्रिकेट फॅन्स देखील त्यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत.

दरम्यान सामन्याचा विचार केला असता दुसरा दिवस देखील गाजवला तो इंग्लंडचा कर्णधार जो रुटने. रुटने 377 चेंडूत 19 चौकार व 2 षटकारासह 218 धावांची शानदार खेळी केली. रुट त्रिशतक झळकावणार अशी शक्यता वाटत असतानाच शाहबाज नदीमने त्याला बाद केले.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 180 षटकात 8 गडी गमावत 555 धावांपर्यंत मजल मारली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांना झटपट बाद करण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

आयएसएल २०२०-२१ : एटीके मोहन बागानकडून ओदीशाचा धुव्वा

राज्य निवडचाचणी कुस्ती स्पर्धेत बीड जिल्ह्यातील पैलवान अमोल मुंढे विजयी! आता गाजवणार पंजाबचं मैदान

हॉटेलवर परताच रुटला बसला आनंदाचा धक्का, चेन्नईकरांच्या स्वागताने भारावला विक्रमवीर; पाहा सुंदर व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---