---Advertisement---

राज्य निवडचाचणी कुस्ती स्पर्धेत बीड जिल्ह्यातील पैलवान अमोल मुंढे विजयी! आता गाजवणार पंजाबचं मैदान

On: शनिवार, फेब्रुवारी 6, 2021 10:12 PM
---Advertisement---

मेहनतीला पर्याय नसतो आणि मेहनत केल्यानंतर फळ मिळाल्याशिवाय राहत नाही, असे आपल्याकडे म्हणतात. तीच उक्ती आज महाराष्ट्राच्या एका युवा पैलवानाने खरी करून दाखवली. बीड जिल्ह्यातून पुणे येथे येऊन अमोल मुंढे या कुस्तीपटूने राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्रता मिळवली. त्याच्या या कामगिरीचे सर्वजण कौतुक करत आहेत. राष्ट्रकुल विजेता राहुल आवारे याच्यासह तो सराव करतो.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी मिळवली पात्रता

कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल येथे आज (६ फेब्रुवारी) वरिष्ठ राष्ट्रीय ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेसाठीची राज्य निवड चाचणी पार पडली. यात ८७ किलो वजनी गटात अमोल मुंढे याने विजय मिळवत राष्ट्रीय स्पर्धेत तिकीट पक्के केले. त्याच्यासोबतच महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके यांनी देखील राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी सर्व कुस्तीपटूंचे अभिनंदन केले.

गरीब कुटुंबातून पुढे आला आहे अमोल

अमोल हा मूळचा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पाचंग्री गावचा रहिवासी आहे. त्याने कुस्तीचे सुरूवातीचे धडे पाटोदा येथील जय हनुमान तालमीत घेतले. ही तालीम आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारे यांचे वडील बाळासाहेब आवारे हे चालवतात. त्यानंतर, अमोलने पुणे येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.

अमोलसोबत या नामवंतांनी मिळवली पात्रता

पंजाब येथील पगवाडा येथे २० व २१ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे. यासाठी महाराष्ट्र संघात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याने १३० किलो तर उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके याने ९७ किलो वजनी गटातून पात्रता मिळविली. याव्यतिरिक्त अभिजीत पाटील, तानाजी विरकर, सद्दाम शेख, गौतम यादव, प्रीतम खोत, समीर पाटील व शिवाजी पाटील यांनी विविध वजनी गटातून राष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळवले.

महत्वाच्या बातम्या:

सिराज-कुलदीपमध्ये झाली हमरातुमरी?, व्हिडिओ होतोय व्हायरल

भारताच्या संघव्यवस्थापनाची पहिल्या कसोटीसाठी हास्यास्पद संघनिवड, या दिग्गजाची टीका

खो गए हम कहां! चेंडू उडाला एका दिशेला आणि पंत पळाला भलत्याच दिशेला, पाहा मजेशीर व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---