---Advertisement---

खो गए हम कहां! चेंडू उडाला एका दिशेला आणि पंत पळाला भलत्याच दिशेला, पाहा मजेशीर व्हिडिओ

On: शनिवार, फेब्रुवारी 6, 2021 5:23 PM
---Advertisement---

भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत मैदानावर विविध घटनांनी सतत चर्चेत असतो. यष्टिमागून तो करत असलेले स्लेजिंग आणि गोलंदाजांना देत असलेल्या सूचना यांचे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. यापूर्वी २०१७-१८ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन याच्याशी ‘बेबी सिटिंग’ वरुन झालेले संभाषण चांगलेच गाजले होते.

इंग्लंडविरुद्ध कालपासून (५ फेब्रुवारी) सुरु झालेल्या सामन्यात देखील पंतने यष्टिमागून मजेदार कमेंट्स करत अशीच धमाल उडवून दिली. त्याची चर्चा संपत नाही तोच पंतचा एक भन्नाट आणि विनोदी व्हिडिओ समोर आला आहे.

त्याचे झाले असे की, दुसऱ्या दिवसाच्या खेळात आर अश्विनच्या गोलंदाजीवर इंग्लंडचा फलंदाज ओली पोप फलंदाजी करत होता. त्याने स्वीप मारण्याचा प्रयत्न केला असता चेंडू बॅटची कड घेऊन उंच उडाला. चेंडू पंतच्या डोक्यावरून मागे गेला होता, मात्र गोंधळलेल्या पंतला चेंडू न दिसल्यामुळे तो पॉईंटच्या दिशेला धावला.

एका चाहत्याने हा मजेशीर व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. पंतचा हा गोंधळलेला अवतार पाहून तो सोशल मिडीयावर अतिशय वेगाने व्हायरल देखील होत आहे.

https://twitter.com/beyondmatches/status/1357985547520598017?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1357985547520598017%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fcricket%2Findia-vs-england-1st-test-rishabh-pant-entertainment-look-video-you-also-laugh-a593

दरम्यान, सामन्याचा विचार केला असता दुसरा दिवसही इंग्लंडच्या नावे राहिला. कर्णधार जो रूटने शानदार द्विशतक झळकवत संघाला मजबूत स्थितीत नेऊन ठेवले. त्याने ३७७ चेंडूत २१८ धावांची मॅराथॉन खेळी केली. बेन स्टोक्सने देखील ११८ चेंडूत ८२ धावांची आक्रमक खेळी केली. त्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडच्या ८ बाद ५५५ धावा झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

मला अवॉर्ड मिळणार नाही का? विराटच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक होत असताना इंग्लिश गोलंदाजाची विनोदी प्रतिक्रिया

INDvsENG 1st Test: जो रुटच्या विक्रमी द्विशतकानंतर इंग्लंडचं शेपूटही वळवळलंच; दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या ८ बाद ५५५ धावा

थँक्यू नदीम! ज्याच्या निवडीवरून केली टीका तोच ठरला टीम इंडियाचा संकटमोचक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---