---Advertisement---

पाकिस्तानच्या शाळांमध्ये विद्यार्थी गिरवतायेत बाबर आझमचे धडे, सर्वत्र रंगलीये चर्चा

On: बुधवार, सप्टेंबर 14, 2022 7:31 PM
babar-azam
---Advertisement---

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आज जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने पाकिस्तानचे नेतृत्व स्वीकारल्यापासून संघाने अनेक महत्वाच्या मालिका आणि सामने जिंकले आहेत. बाबर मैदानात एकापेक्षा एक सुरेख शॉट्स खेण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या कवर ड्राईव्हची खास चर्चा होत आली आहे. आता त्याच्या याच शॉटची चर्चा विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्ताकांमध्येही होताना दिसत आहे. 

बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तान संघात जबरदस्त सुधारणा पाहायला मिळाली आहे. यादरम्यानच्या काळात त्याचे वैयक्तिक प्रदर्शन देखील अप्रतिम होते.  असे असले तरी बाबर आझम (Babar Azam) मागच्या काही दिवसांपासून खारब फॉर्मशी झगडत आहे. नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक 2022 मधील सहा डावांमध्ये त्याने अवघ्या 68 धावा केल्या. आशिया चषकात त्याने 10, 9, 14, 0, 30 आणि 5 असे प्रदर्शन केले आहे.

बाबरच्या कवर ड्राईव्हचे चाहते जगभरात असले तरी, यावेळी त्याची चर्चा थेट विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांपर्यंत पोहोचली आहे. पाकिस्तानमध्ये एका फिजिक्स विषयाच्या पुस्ताकात बाबर आझमच्यां कव्हर ड्राईव्हशी संबंधित एक प्रश्न विचारला गेला आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराने हा फोटो ट्वीट केला आहे. प्रश्न विचारला गेला आहे की, “बाबर आझमने त्याच्या बॅटने 150J च्या कायनॅटिक एनर्जीने कव्हर ड्राईव्ह मारला आहे. जर चेंडूचे मास 120 ग्राम असेल तर तो कोणत्या गतीने सीमारेषेपार जाईल.” विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर शोधायला सांगितले गेले आहे.

दरम्यान, आशिया चषकात पाकिस्तान संघाचे प्रदर्शन चांगले राहिले होते. पण सुपर फोरमधील शेवटच्या आणि अंतिम सामन्यात त्यांना श्रीलंका संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तान आशिया चषक जिंकण्यासाठी सर्वात प्रबळ दावेदार मानला जात होता, कारण भरतीय संघ आधीच अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर झाला होता. परंतु श्रीलंकन संघाने अनपेक्षितपणे बाजी मारली. दरम्यान, आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर बाबर आझम पाकिस्तानचा सर्वात महत्वाचा फलंदाज आहे. त्याने चांगले प्रदर्शन केले नाही, तर संघाच्या विश्वचषक जिंकण्याच्या अपेक्षा देखील नाहीच्या बरोबर असतील, असे जाणकारांचे मत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या- 
ऑस्ट्रेलियात रोहित-राहुल अन् पंतची बॅट होते म्यान! आशा फक्त विराटवर; पाहा आकडेवारी
टी-20 विश्वचषकात होणार हर्षल पटेलची धुलाई? पत्रकाराच्या प्रश्नावर गावसकरांचे रोखठोक उत्तर, म्हणाले…
पत्नीकडून सूर्यकुमारला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा; खास फोटो पोस्ट करत लिहिले, ‘हॅप्पी बर्थडे बेबी…’   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---