आशिया चषक 2022 मध्ये बुधवारी (31 ऑगस्ट) भारत आणि हाँगकाँग संघ आमने सामने येणार आहेत. दुबईच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यात भारताचे पारडे हाँगकाँगपुढे जड आहे. परंतु हाँगकाँगच्या बाबर हयात याच्या नावे आशिया चषकात असा विक्रम आहे, जो तोडण्यासाठी भारतीय खेळाडूंचा घाम निघेल. बाबरच्या नावे असलेला हा विक्रम मागील 6 वर्षांपासून अबाधित आहे. काय आहे तो विक्रम, याबद्दल जाणून घेऊ…
भारतीय संघाचे आशिया चषकाच्या (Asia Cup 2022) सुपर-4 फेरीत प्रवेश करणे जवळपास निश्चित आहे. अ गटात कट्टर प्रतिद्वंद्वी पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का देत भारताने विजयी डंका फोडला होता. त्यांनी 5 विकेट्सने हा सामना जिंकला होता. त्यानंतर आता हाँगकाँगलाही पराभूत करत भारतीय संघ अ गटातून सुपर-4 फेरीत जाणारा पहिलाच संघ बनेल.
भारतीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा (Rohit Sharma), हार्दिक पंड्यासह भरपूर प्रतिभाशाली फलंदाज आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाहून एक मोठे विक्रम केले आहेत. परंतु एक असा विक्रम हाँगकाँगच्या बाबरच्या नावावर आहे, जो फक्त भारतीयच नव्हे तर आशिया चषकातील कोणताही फलंदाज करू मोडू शकलेला नाही.
आपणा सर्वांना माहिती आहे की, दर 2 वर्षांनी होणारा आशिया चषक आतापर्यंत फक्त एकदा टी20 स्वरूपात खेळला गेला आहे. 2016 साली आशिया चषक पहिल्यांदा टी20 स्वरूपात झाला होता. याच हंगामात हाँगकाँगच्या बाबरने (Babat Hayat) हा अद्वितीय विक्रम आपल्या नावावर केला होता. टी20 स्वरूपातील आशिया चषकात सर्वोच्च वैयक्तिक खेळी करण्याचा हा विक्रम आहे. बाबरने ओमानविरुद्ध 60 चेंडूत 122 धावा करत हा विक्रम आपल्या नावावर (Highest Individual Score) केला होता. या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून 7 षटकार आणि 9 चौकारही निघाले होते.
बाबरनंतर टी20 स्वरूपातील आशिया चषकात सर्वोच्च वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर आहे. त्याने 2016 मध्येच बांगलादेशविरुद्ध 83 धावा केल्या होत्या.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Video: श्रीनाथ यांनी टाकलेला तो घातक चेंडू, ज्यामुळे फलंदाज जखमी होऊन पडला होता खाली
झादरान द फिनिशर! अफगाणी फलंदाजांचा चमत्कारिक सिक्स, पुल आणि स्कूपचे केले मिश्रण
एकेकाळी काट्याची टक्कर देणाऱ्या हाँगकाँगविरुद्ध भारत करणार प्रयोग! अशी असेल प्लेइंग इलेव्हन