---Advertisement---

पुणे महापौर कबड्डी स्पर्धेत बाबुराव चांदेरे फौंडेशन, शिवशंकर संघाचा बादफेरीत प्रवेश

On: मंगळवार, फेब्रुवारी 25, 2020 7:35 PM
---Advertisement---

कोथरुड। पुणे महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने  व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने राज्यस्तरीय मॅटवरील कोथरुड येथील जीत मैदानावर सुरू असलेल्या पुरूष व महिला खुले गट महापौर चषक कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाच्या पुरूष विभागात सतेज संघ, राणाप्रताप, अभिजित दादा कदम प्रतिष्ठान, भैरवनाथ कबड्डी संघ, नवभारत संघ, स्वास्तिक संघ, विजय स्पोर्टस् क्लब, शिवशंकर क्रीड मंडळ, मॉर्डन स्पोर्टस्, ब्रम्हा विष्णू महेश संघ, युवक क्रीडा मंडळ, उत्कर्ष क्रीडा संस्था, अंकुर स्पोर्टस्, शाहू सडोली, राष्ट्रसेवक तळसंदे कोल्हापूर या संघानी बाद फेरीत प्रवेश केला.

सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात पुण्याच्या उत्कर्ष क्रीडा संघाने ठाण्याच्या शिवशंकर संघावर 19-15 अशी मात केली. मध्यंतराला उत्कर्ष संघ 7-12 अशी पिछा़डीवर होता.उत्कर्षच्या गणेश कांबळे व शुभम गायकवाड यांनी चौफेर चढाया करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर ओंकार घोडके व तुषार आदवडे यांनी नेत्रदिपक पकडी घेतल्या. शिवशंकर संघाच्या मंगेश सोनावणे व सौरभ राऊत यांनी चांगला प्रतिकार केला. पुण्याच्या सतेज संघाने कोल्हापूर तळसंदेच्या राष्ट्रसेवक संघावर 39-36 असा विजय मिळविला. मध्यंतराला सतेज संघाकडे 23-16 अशी आघाडी होती. सतेज संघाच्या शुभम कुंभार व विनित कालेकर यांनी चौफेर चढाया करीत हल्ला चढविला. तर प्रमोद सिंग व आत्माराम कदम यांनी चांगल्या पकडी घेतल्या. राष्ट्रसेवा संघाच्या राजवर्धन लोडे व अनिकेत चव्हाण यांनी चांगला प्रतिकार केला. तर प्रविण नायकवडी व प्रथमेश साळवी यांनी महत्त्वाच्या पकडी घेतल्या.

सायंकाळच्या सत्रात महिलांच्या झालेल्या सामन्यात राजा शिवछत्रपती संघाने आकांक्षा कला क्रीडा क्रेंद्र संगाला 76-3 अशी धुळ चारली. मद्यंतरला राजा शिवछत्रपती संघाकडे 47-3 अशी निर्णायक आघाडी होती. मध्यंतरानंतर राजा शिवछत्रपती संघाने आकांक्षा कला क्रीडा संघाला एकही गुण मिळवू दिला नाही. राजा शिव छत्रपती संघाच्या अलफरा मेनन या बलाढ्य शरीरयष्ठीच्या खेळाडूने मैदानावर चौफेर चढाया करीत आपल्या संघाच्या विजयाच मोलाचे योगदान दिले. तीला रिध्दी मराठे व मानसी रोडे यांनी चांगला खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

आकांक्षा कला क्रीडा संस्थेच्या नेहा मुसळे हिने एकाकी लढत दिली. महिलांच्या मुंबई उपनगर स्वराज्य क्रीडा संस्था व पुण्याच्या शिव ओम संघात झालेल्या अत्यंत अटितटीच्या साखळी सामन्यात 28-28 असा समान गुणांवर संपल्याने दोन्ही संघाना एक एक गुण देण्यात आला. मध्यंतराला दोन्ही संघ 11-11 अशा समान गुणांवर होते. स्वराज्य संघाच्या स्मिता पांचाळ व येशिका पुजारी यांनी उत्कृष्ठ चढाया केल्या तर काजल खैरे व समृध्दी मोहिते यांनी चांगल्या पकडी घेतल्या.

शिव ओम संघाच्या निकिता पडवळ व पायल वसवे यांनी चौफेर चढाया केल्या. तर तुर्फी दुर्गे हिने चांगल्या पकडी घेतल्या. शिवशक्ती मुंबई संघाने मातृभूमी क्रीडा प्रतिष्ठान संघावर 50-23 अशी मात करीत विजय मिळविला. मध्यंतराला शिवशक्ती संघाकडे 27-11 अशी आघाडी होती. शिवशक्ती संघाच्या ज्योती डफळ व मानसी पाटील यांनी उत्कृष्ठ चढाया केल्या. तर रेखा सावंत हिने चांगल्या पकडी घेतल्या. मातृभूमी संघाच्या सिजना योगी व दिक्षिता भोसले यांनी चांगली लढत दिली. तर निकिता चव्हाण हिने उत्कृष्ठ पकडी घेतल्या.

पुरूष विभागात सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात पुण्याच्या उत्कर्ष क्रीडा संघाने ठाण्याच्या शिवशंकर संघावर 19-15 अशी मात केली. मध्यंतराला उत्कर्ष संघ 7-12 अशी पिछा़डीवर होता.उत्कर्षच्या गणेश कांबळे व शुभम गायकवाड यांनी चौफेर चढाया करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर ओंकार घोडके व तुषार आदवडे यांनी नेत्रदिपक पकडी घेतल्या. शिवशंकर संघाच्या मंगेश सोनावणे व सौरभ राऊत यांनी चांगला प्रतिकार केला. पुण्याच्या सतेज संघाने तळसंदेच्या राष्ट्रसेवा संघावर 39-36 असा विजय मिळविला. मध्यंतराला सतेज संघाकडे 23-16 अशी आघाडी होती. सतेज संघाच्या शुभम कुंभार व विनित कालेकर यांनी चौफेर चढाया करीत हल्ला चढविला. तर प्रमोद सिंग व आत्माराम कदम यांनी चांगल्या पकडी घेतल्या. राष्ट्रसेवा संघाच्या राजवर्धन लोडे व अनिकेत चव्हाण यांनी चांगला प्रतिकार केला. तर प्रविण नायकवडी व प्रथमेश साळवी यांनी महत्त्वाच्या पकडी घेतल्या.

पुरूष विभागात सकाळच्या सत्रात झालेल्या इतर सामन्यांचे निकाल-

नवभारत कबड्डी संघ वि.वि. वाशी रोहा (37-33),
जयभारत मुंबई वि.वि. सरस्वती पुणे(34-6),
स्वास्तिक मुंबई वि.वि.श्रीकृष्ण संघ बाणेर(29-19),
एनटीपीएस नंदुरबार वि.वि. शिवगर्जना कबड्डी संघ(32-20),
टीबीएम रायगड वि. वि. अतुलदादा बेनके (21-8),
ब्रम्हा विष्णू महेश वि.वि. विजय क्लब मुंबई(33-30),

सायंकाळच्या सत्रात महिलांचे झालेले इतर सामने-
सुवर्ण युग स्पोर्टस् वि.वि. जिजाऊ स्पोर्टस् (39-10),
महात्मा गांधी स्पोर्टस् वि.वि. डॉ. पतंगराव कदम (32-25),

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---