भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात टी20 विश्वचषक 2022मधील 30 वा सामना रविवारी (दि. 30 ऑक्टोबर) पर्थ येथे पार पडला. या स्पर्धेतील हा भारताचा तिसरा सामना होता. या सामन्यात भारताची सुरुवात थोडी खराब झाली. मात्र, पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव याने फलंदाजीला येत भारताचा डाव सांभाळला आणि स्वत:च्या नावावर एका खास नावाची विक्रम केली. चला तर जाणून घेऊया तो विक्रम आहे तरी काय…
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा (15) आणि केएल राहुल (9) यांना फार चांगली कामगिरी करता आली नाही. त्यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरील विराट कोहली हादेखील फक्त 12 धावा करत तंबूत परतला. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) फलंदाजीला आला. त्याने एका बाजूने किल्ला लढवत ठेवला आणि 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. एका बाजूने संघाच्या विकेट्स पडत होत्या, पण दुसऱ्या बाजूने सूर्या भक्कमपणे उभा होता.
FIFTY for @surya_14kumar! 👍 👍
2⃣nd half-century in a row! 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/KBtNIjPFZ6 #TeamIndia | #T20WorldCup | #INDvSA pic.twitter.com/OIuP2H2l9A
— BCCI (@BCCI) October 30, 2022
हे अर्धशतक झळकावताच सूर्यकुमारने टी20 विश्वचषकात सलग अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला. त्याने नेदरलँड्सविरुद्धच्या मागील सामन्यात नाबाद 51 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्याने 68 धावांची अर्धशतक झळकावले.
भारतासाठी टी20 विश्वचषकात सलग अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वलस्थानी गौतम गंभीर आहे. त्याने 2007 साली सलग 51 आणि 58 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या स्थानी युवराज सिंग असून त्याने त्याच वर्षी 58 आणि 70 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर 2014च्या टी20 विश्वचषकात दोन खेळाडूंनी अशी कामगिरी केली होती. त्यामध्ये रोहित शर्मा (62 आणि 56*) आणि विराट कोहली (54, 57* आणि 72*, 77) यांचा समावेश होता. त्यानंतर 2016च्या टी20 विश्वचषकात पुन्हा विराट कोहलीने 82* आणि 89* अशी सलग नाबाद अर्धशतकी खेळी होती. पुढे 2021च्या टी20 विश्वचषकात केएल राहुल याने 69 आणि 50 अशी सलग अर्धशतके झळकावली होती. आता 2022च्या विश्वचषकात सूर्यकुमारसोबतच विराट कोहली याने पुन्हा एकदा 82* आणि 62* अशी सलग दोन अर्धशतके झळकावली.
टी20 विश्वचषकात सलग दोन अर्धशतके झळकावणारे खेळाडू
51 आणि 58- गौतम गंभीर (2007)
58 आणि 70- युवराज सिंग (2007)
62 आणि 56*- रोहित शर्मा (2014)
54 आणि 57*- विराट कोहली (2014)
72* आणि 77- विराट कोहली (2014)
82* आणि 89*- विराट कोहली (2016)
69 आणि 50- केएल राहुल (2021)
82* आणि 62*- विराट कोहली (2022)
51* आणि 50*- सूर्यकुमार यादव (2022)*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटने गाजवला टी20 विश्वचषक, तब्बल 83.41च्या सरासरीने चोपल्यात 1000 धावा
पाकिस्तान संघ जिंकला, तरीही ‘या’ बाबतीत बाबर विराटच्या खालीच; स्वत:च ठरलाय कारणीभूत