---Advertisement---

‘या’ खेळाडूची निवड करुन मुंबई इंडियन्सने मोठी चुक केली, माजी दिग्गजाचे धक्कादायक वक्तव्य 

On: बुधवार, एप्रिल 14, 2021 2:49 PM
---Advertisement---

आत्तापर्यंतच्या आयपीएल इतिहासात पाच वेळा विजेत्या ठरलेल्या मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएल 2021 च्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्धच्या पहिल्या सामन्यात दक्षिण-आफ्रिकेच्या मार्को जानसेनला अंतिम अकरामध्ये स्थान दिले होते. या गोलंदाजाने या सामन्यात आरसीबीविरुद्ध चांगली कामगिरी करुन सर्वांना प्रभावित केले. त्याने चार षटकांत 28 धावा देऊन दोन बळी मिळवले होते. मात्र या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला होता.

यानंतर न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्कॉट स्टायरिस याने जानसेनची निवड करणे ही मुंबईची चूक असल्याचे म्हटले आहे.

अगोदर स्टायरिसने जानसनचे कौतुक केले आणि सांगितले की, आयपीएलमध्ये येणाऱ्या काळात तो चमकदार कामगिरी करेल. स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमामध्ये स्टायरिस म्हणाले की, “माझ्या मते त्याने केलेली कामगिरी ही चांगली कामगिरी होती. त्याने या सामन्यात सर्वाना प्रभावित केले. त्याचे चमकदार कामगिरी करण्याचे कारण तो उंच आहे. त्यामुळे त्याने टाकलेल्या चेंडूला बाऊन्स मिळतो. इतकेच नाही तर तो 143 प्रति किमीच्या वेगाने गोलंदाजी करतो. त्यामुळे त्याच्याकडे असलेल्या वेगाने तो चेंडू अधिक उसळी घेतो.”

कौतुक केल्यानंतर दुसरीकडे स्टायरिसने आयपीएल 2021 मध्ये जानसेनला खेळवणे हा मुंबई इंडियन्सचा चुकीचा निर्णय असल़्याचे सांगितले आहे. कारण चमकदार कामगिरीमुळे तो आता चर्चेचा विषय झाला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या लिलावात त्याच्यासाठी मुंबईला प्रचंड किंमत मोजावी लागणार आहे असे म्हटले आहे.

ते म्हणाले की, “मुंबई इंडियन्सने यावेळी जानसेनची निवड करणे हा चुकीचा निर्णय असे मला वाटते. कारण तो आता तो सर्वांच्या नजरेत आला असून तो आता चर्चेचा विषय बनला आहे. जसे आपण त्यांच्याबद्दल बोलत आहोत, तसेच बाकी काहीजण त्याच्याबद्दल बोलत असणार. पुढच्या वर्षी आयपीएलचा मोठा लिलाव होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मला वाटते की जानसेनला आपल्या ताफ्यात ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्सला खूप मोठी रक्कम मोजावी लागू शकते.”

तसेच ते म्हणाले, “त्यामुळे मी मुंबई इंडियन्सला विचार करण्याचा सल्ला देतो. यावर्षी जानसेन चांगली कामगिरी करेल अशी शक्यता आहे, जेणेकरुन मुंबई इंडियन्स एखाद्या खेळाडूची जागा त्याला देऊन बराच काळ संघात ठेवेल. तसेच पुढच्या दहा वर्षांत आयपीएलमध्ये आघाडीच्या वेगवान गोलंदाजांप्रमाणे तो खेळी करू शकेल अशी या गोलंदाजामध्ये क्षमता आहे असे मला वाटते.”

महत्त्वाच्या बातम्या-

सर्वत्र ‘सूर्या’च्या ९९ मीटरच्या षटकाराची चर्चा, पण हा शॉट कुठे आणि कधी खेळायला सुरुवात केली? पाहा

‘आज जे काही आहे, ते फक्त मुंबई इंडियन्समुळेच,’ केकेआरच्या क्रिकेटपटूचे मन जिंकणारे वक्तव्य

‘मुंबई इंडियन्सची बॅटिंग चालू आहे, मुद्द्याचचं बोला,’ मुख्यमंत्र्यांचे लाईव्ह चालू असताना चाहत्याची विनोदी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---