भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८ गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात भारतासाठी आणखी एक वाईट घटना घडली, ती म्हणजे स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला झालेली दुखापत. शमी बद्दल आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, बातमी नुसार तो आगामी दीड महिने क्रिकेट पासून दूर असणार आहे.
भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना शमीच्या हाताला चेंडू लागला. चेंडू हाताला लागल्यानंतर शमीला हाताची हालचाल देखील करता आली नाही. त्यामुळे तो उर्वरित सामन्यातून बाहेर झाला. सामना संपल्यानंतर शमीच्या दुखापतीबद्दल स्कॅन केले असता लक्षात आले की त्याच्या हाताला फॅक्चर झाले आहे.
एका सुत्राकडून मिळालेल्या बातमी नुसार शमीला जवळ -जवळ सहा आठवडे क्रिकेट मधून विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच त्याला दुखापतीनंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करावा लागेल. त्यामुळे आता शमीच्या इंग्लंड विरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशात इंग्लंडविरुद्ध ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामन्यांच्या मालिका खेळणार आहे. इंग्लंडच्या या भारतीय दौऱ्याला ५ फेब्रुवारी २०२१ पासून कसोटी मालिकेने सुरुवात होईल.
शमी ऐवजी सिराज किंवा सैनीला संधी –
शमी दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील उर्वरित ३ सामन्यातून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी पुढील सामन्यांसाठी मोहम्मद सिराज किंवा नवदीप सैनी या दोघांपैकी एकाला भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळू शकते.
नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन परतला भारतात
भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन मंगळवारी ऑस्ट्रेलियातून भारतासाठी रवाना झाला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध उर्वरित कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करेल. या मालिकेतील पुढील सामना २६ डिसेंबर पासून सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
खुशखबर! ‘या’ दिवशी रोहित शर्मा भारतीय संघाशी जोडला जाणार
सोळा वर्षे आणि सोळा गोष्टी! जाणून घ्या धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोमांचक प्रवास
ऑस्ट्रेलियाला धक्का! वॉर्नरसह ‘हा’ खेळाडू देखील भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला मुकणार