स्टार भारतीय बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विष्णू विशाल यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. ते दोघे २२ एप्रिलला लग्न करणार असल्याचे त्यांनी चाहत्यांना सांगितले आहे. असे सांगितले जात आहे की त्यांचे लग्न एक खाजगी कार्यक्रम असेल ज्यात फक्त निमंत्रित पाहुण्यांनाच प्रवेश असेल.
विष्णू विशाल हा जरी सध्या प्रसिद्ध अभिनेता असला तरी तो अभिनय क्षेत्रात येण्याआधी तामिळनाडूसाठी क्रिकेट खेळलेला आहे. ज्वाला आणि विष्णू या दोघांनी त्यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे. ते दोघे एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेट करत होते. विष्णू विशालचे हे दुसरे लग्न आहे. साल २०१० मध्ये त्याने रजनी नटराजशी लग्न केले होते आणि त्यांना एक मुलगा देखील आहे. विष्णू साल २०१८ मध्ये रजनीपासून विभक्त झाला.
त्यानंतर त्याने ज्वालाला डेट करण्यास सुरवात केली. ज्वालाचे पण हे दुसरे लग्न असून तिने पहिले लग्न बॅडमिंटनपटू चेतन आनंदशी केले होते. तिने आणि चेतनने २०११ साली घटस्फोट घेतला आहे.
— Gutta Jwala 💙 (@Guttajwala) April 13, 2021
विष्णू विशालने तामिळनाडू लीगमधील सामने खेळले आहेत. तसेच तो आर आश्विन आणि बद्रीनाथसारख्या खेळाडूंसोबत क्रिकेट खेळला आहे. सततची दुखापतीमुळे त्याला खेळापासून लांब व्हावे लागले. त्याने खेळापासून दूर झाल्यावर चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. याबरोबरच ज्वाला देखील भारताची अव्वल बॅटमिंटनपटूंपैकी एक आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
संपूर्ण वेळापत्रक: असा असेल टीम इंडियाचा इंग्लंड दौरा; तब्बल ६ वर्षांनी खेळणार कसोटी सामना
दुसऱ्या टी२० मध्ये पाकिस्तानचे कंबरडे मोडणारा कोण आहे जॉर्ज लिंड, घ्या जाणून
रोहितचे अर्धशतक हुकले पण केला ‘हा’ मोठा कारनामा; आता केवळ विराट आणि रैना आहेत पुढे