पुणे। ख्याती कत्रे, सोयरा शेलार, नील जोशी, विराज सराफ यांनी महाराष्ट्रीय मंडळ आयोजित हौशी खेळाडूंच्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
जोशीज बॅडमिंटन क्लब, देवधर बॅडमिंटन अकॅडमीच्या सहकायार्ने व पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने होत असलेली ही स्पर्धा टिळक रस्त्यावरील भोपटकर हॉलमध्ये सुरू आहे. या स्पधेर्तील ११ वर्षांखालील मुलींच्या उपांत्य फेरीत ख्याती कत्रे हिने आर्या कुलकर्णीवर ७-१५, १६-१४, १६-१४ असा, तर सोयरा शेलारने रिद्धीमा जोशीवर १५-११, १५-६ असा विजय मिळवला.
यानंतर ११ वर्षांखालील मुलांच्या गटाच्या उपांत्य फेरीत नील जोशीने राघवेंद्र यादववर १५-७, १५-१० अशी, तर विराज सराफने अर्चित व्यासवर १५-१२, १५-११ अशी मात केली.
सिमरन, नंदिनी अंतिम फेरीत
स्पधेर्तील १५ वर्षांखालील मुलींच्या गटाच्या उपांत्य फेरीत सिमरन धिंग्राने साक्षी दसवेकरचा १५-७, १५-८ असा, तर नंदिनी भार्गवने वसुधा यादवचा १५-६, १५-११ असा पराभव केला. यानंतर मुलांच्या गटात ओम होजगेने सुदीप खोरटेवर १७-१५, १५-९ अशी, तर जोचीम जॉनने नमन सुधीरवर १५-१०, १५-१३ अशी मात करून अंतिम फेरी गाठली.
निकाल –
मिश्र दुहेरी – उपांत्य फेरी – शुभम शिंदे- सई जाधव वि. वि. मिहीर रतनजानकर – ऐश्वर्या बांदल १५-१३, १४-१६, १५-९, अभिलाश नायर-सुमित्रा हांगर्गेकर वि. वि. सनत पटवर्धन -स्वप्ना बेलसरे १५-१३, १८- १६.