पुणे । संविधा लांडे, सानिका देशपांडे, लतिका पुजारी यांनी महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने आयोजित हौशी खेळाडूंसाठी आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
जोशीज बॅडमिंटन क्लब, देवधर बॅडमिंटन अकॅडमी व पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा टिळक रस्त्यावरील केळकर-भोपटकर हॉलमध्ये सुरू आहे.
या स्पर्धेत ११ वर्षांखालील मुलींच्या सलामीच्या लढतीत संविधा लांडेने देविका गोगरीवर १५-७, १५-० अशी, तर सानिका देशपांडेने रिद्दीमा पवारवर १५-८, १५-७ अशी मात केली. यानंतर लतिका पुजारीने चारुता गोडबोलेवर १५-११, १५-६ असा, तर रिद्दीमा जोशीने वैष्णवी सोनाकुलवर १५-४, १५-५ असा विजय मिळवला. मुक्तजा वाघळेने अभिज्ञा ठोंबरेला १५-१२, १५-१३ असे, तर आलीया सोनीने शार्वी केळकरला १५-१०, १५-९ असे नमविले आणि दुसरी फेरी गाठली.
निकाल ।
दुसरी फेरी – ११ वर्षांखालील मुले – नील जोशी वि. वि तन्मय कुलकर्णी १५-४, १५-८, जय कुलकर्णी वि. वि. आदित्य पाटणकर १०-१५, १५-१०, १५-१०, अथर्व काळे वि. वि. अयान देव १५-१, १५-८, पार्थ सहस्त्रबुद्धे वि. वि. आरुष अरोरा १५-४, १५-८, अजिंक्य जोशी वि. वि. इशान राजे १५-४, ११-१५, १५-११, राघवेंद्र यादव वि. वि. मल्हार प्रभूणे १५-५, १५-१२, रोहन सायनकर वि. वि. लौकिक देशपांडे १५-९, १९-१७, सयाजी शेलार वि. वि. रुद्रा गोगटे १५-३, १५-२, समीहान देशपांडे वि. वि. सुकृत दीक्षित १५-६, १५-७, स्वरीत सातपुते वि. वि. युगंधर गंधे १५-३, १५-४, अर्चित व्यास वि. वि. वेदांत कुंटे १५-४, १५-५.
दुसरी फेरी – १३ वर्षांखालील मुले – सुदीप खोरटे वि. वि. आरुष अरोरा १५-६, १५-४, कृष्णानील गोरे वि. वि. वेद घारडे १५-९, १५-११, विहान छांगेदिया वि. वि. निपून अगरवाल १५-१३, १५-७, पार्थ मिराशी वि. वि. देवर्ष पातुरकर १६-१४, १३-१५, १५-११, तनिष दरपे वि. वि. श्लोक मेधी १५-८, १६-१४, स्वरीत सातपुते वि. वि. अमोघ मोडक १५-५, १५-३, श्रेयस मसलेकर वि. वि. निशाद निजासुरे १३-१५, १५-१३, १५-३. श्रेयस लागू वि.वि. आरव हेगडे १५-१०,१५-११