---Advertisement---

पुण्यात होणाऱ्या वनडेत ‘या’ अष्टपैलू खेळाडूला मिळणार भारतीय संघाकडून वनडे पदार्पणाची संधी!

Team-India
---Advertisement---

आजपासून (२३ मार्च) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये, भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज खेळवला जाणार आहे. तसेच टी-२० मालिका जिंकलेल्या भारतीय संघासमोर वनडे मालिकेतही इंग्लंड संघाला पराभूत करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. अशातच पहिल्या सामन्यातही आणखी एका नवोदित खेळाडू संघात पदार्पण करण्याची शक्यता आहे.

भारतीय संघाने २०२० मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून मोहम्मद सिराज, टी नटराजन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी अशा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी दिली होती. नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेत, भारतीय संघात युवा इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना संधी देण्यात आली आहे. यानंतर इंग्लंविरुद्ध होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात बडोदा संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या याला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

कृणालने नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत वनडे स्वरुपातील आपली क्षमता दाखवून दिली आहे. त्याने २०२०-२१ च्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत बडोदा संघासाठी सर्वाधिक धावा करत ३८८ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघ या अष्टपैलू खेळाडूला पहिल्या वनडेतील अंतिम ११ जणांच्या संघात समाविष्ट करण्याचा नक्कीच विचार करेल.

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये बडोदा संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कृणालने २०१४ मध्ये लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत एकूण ६६ सामने खेळले आहेत. यात त्याने १९८३ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने ११ अर्धशतक आणि २ शतकदेखील झळकावले आहे. यासोबतच त्याने ८० गडी देखील बाद केले आहेत.

दोन वर्षांपुर्वी केले होते भारतीय टी-२० संघात पदार्पण

कृणालने २०१६ मध्ये आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघात पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय टी-२० संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याने आपला पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना वेस्ट इंडिज संघाविरुद्ध २०१८ मध्ये खेळला होता. त्या सामन्यात त्याने ४ षटक गोलंदाजी करत ३.७५ च्या इकॉनॉमी ने १५ धावा देत १ गडी बाद केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

संपूर्ण टी२० मालिकेत बसला बाकावर, आता तोच वनडेत टीम इंडियाला देणार टशन!

कुछ तो लोग कहेंगे..! केएल राहूलच्या टीकाकारांना कर्णधार विराटचे ‘फिल्मी स्टाइल’ प्रत्युत्तर

एकाची फलंदाजी तर दुसऱ्याची गोलंदाजी, पुणे वनडेत ‘हे’ दोन शिलेदार इंग्लंडसाठी कर्दनकाळ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---