---Advertisement---

मधला स्टम्प उडला, पण बेल्सने सोडली नाही जागा! मैदानी पंचही पडले गोंधळात, तुम्हीच सांगा Out की Not-Out

Bails-Stumps
---Advertisement---

क्रिकेटमध्ये अशा अनेक विचित्र घटना घडताना दिसतात, ज्यामुळे पाहणाऱ्याच्या भुवया उंचावल्याशिवाय राहत नाहीत. अशीच एक हैराण करणारी घटना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्लब क्रिकेट सामन्यादरम्यान घडली. झाले असे की, चेंडू स्टम्पला लागला, पण बेल्स पडल्या नाहीत. त्यामुळे पंचांनी फलंदाजाला नाबाद घोषित केले. या सामन्यातील फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

खरं तर, ऑस्ट्रेलिया (Australia) येथील थर्ड ग्रेड एसीटी (ACT) प्रीमिअर क्रिकेट स्पर्धेत वेस्टर्न डिस्ट्रिक्ट क्रिकेट क्लब विरुद्ध गिनिंडेरा क्रिकेट क्लब (Western Districts against Ginninderra) संघात पार पडला. एका रिपोर्टनुसार, वेस्ट डिस्ट्रिक्ट क्रिकेट क्लबचा सलामीवीर मॅथ्यू बोसुस्टोचा गिनिंडेराचा गोलंदाज अँडी रेनॉल्ड्सने मधला स्टम्प पाडला आणि गोलंदाजासह संघही विकेटचा जल्लोष करू लागला. मात्र, पंचांनी फलंदाजाला नाबाद घोषित केले.

पंचांचा निर्णय
मधला स्टम्प (Stump) पडताच फलंदाज मॅथ्यूही तंबूत जाऊ लागला. यावेळी मैदानात विचित्र वातावरण तयार झाले. दोन्ही मैदानी पंचांनी याविषयी चर्चा केली आणि बऱ्याच चर्चेनंतर मॅथ्यूला नाबाद घोषित केले. नेहमीप्रमाणे, या प्रकरणीही क्रिकेट चाहते दोन गटात विभागले आहेत. काहींनी पंचांच्या नाबाद निर्णयाशी सहमती दर्शवली आहे. कारण, बेल्स (Bails) पडल्या नव्हत्या आणि स्टम्प पूर्णपणे जागेवरून बाजूला पडला नव्हता. दुसरीकडे, काहींनी पंचांचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, पंचांनी आणि सामनाधिकाऱ्यांनी याची खात्री केली पाहिजे होती की, स्टम्प आणि बेल्स एवढे घट्ट लावले नसतील, ज्याने चेंडू लागूनही स्टम्प्स पडणार नाहीत. जेणेकरून अशा असामान्य स्थितीला रोखले जाईल.

नियम काय सांगतो?
चाहते वेगवेगळी मते मांडत असले, तरीही  मेरिलबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) (Marylebone Cricket Club) यांनी बनवलेले क्रिकेटचे नियम अशा स्थितीसाठी पूर्णपणे स्पष्ट आहेत. खरं तर, एमसीसीच्या नियम 29नुसार, कोणताही फलंदाज तेव्हा बाद मानला जातो, जेव्हा बेल्स पूर्णपणे आपल्या जागेवरून बाजूला होतील किंवा एक-दोन स्टम्प्स जमिनीतून पूर्णपणे बाहेर पडतील. या प्रकरणात दोन्हींपैकी काहीच घडले नव्हते. त्यामुळे फलंदाजाला नाबाद घोषित देण्यात आले.

क्रिकेट एसीटीने मधला स्टम्प उघडणे आणि बेल्स न हलण्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, “अशी गोष्ट तुम्हाला दररोज पाहायला मिळत नाही. गिनिंडेरा विरुद्ध वेस्टच्या सामन्यादरम्यान घडलेली घटना आमच्यासाठी स्पष्ट करा. क्रिकेट चाहत्यांनो हे कसे शक्य आहे? भौतिकशास्त्र? च्विंगम? की पावसात बेल्स फुगली?”

आधीही घडलेली अशी घटना
सन 2017मध्येही अशीच काहीशी घटना पाहायला मिळाली होती, जिथे स्ट्रेथमोर हाइट्सविरुद्ध मिड-इयर क्रिकेट असोसिएशन सामन्यात मूनी व्हॅलीसाठी खेळत असलेला फलंदाज जतिंदर सिंग याला बेल्स न पडूनही बाद घोषित केले होते. मात्र, त्या सामन्यात बेल्स न पडताही मधला स्टम्प पूर्णपणे बाहेर पडला होता. (bails remained intact as wicket flew umpire give batsman not out in club cricket match in australia read more)

हेही वाचा-
कांगारूच्या खेळाडूची मोठी मजल! सहकारी अन् भारतीय दिग्गजाला पछाडत ICCचा खास पुरस्कार केला नावे
‘जाड’ असला तरीही रोहित फिटच, भारतीय फिटनेस कोचचे विधान जिंकेल तुमचेही मन; विराटशी केलीय तुलना

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---