मेलबर्न। भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसरा वनडे सामना आज(18 जानेवारी) 7 विकेट्सने जिंकत तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशी जिंकली आहे. याबरोबरच ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच द्विपक्षीय वनडे मालिका जिंकण्याचा इतिहासही भारताने रचला आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 231 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना भारताकडून यष्टीरक्षक एमएस धोनीने 114 चेंडूत नाबाद 87 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आहे. त्याला केदार जाधवने नाबाद 61 धावा करत योग्य साथ दिली आहे.
धोनीचे या मालिकेतील हे तिसरे अर्धशतक होते. त्याने या वनडे मालिकेत पहिल्या सामन्यात 51 आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद 55 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला असून हा त्याचा सातवा मालिकावीर पुरस्कार ठरला आहे.
सामना संपल्यावर मैदानातून पेव्हेलियनमध्ये परतत असताना धोनीने आपल्या हातात असलेला चेंडू फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगरच्या हातात सोपवला. तसेच धोनी यावेळी बांगर यांना ‘बाॅल लेलो, नही तो बोलेंगे धोनी रिटारमेंट ले रहा हैं ‘ असे म्हणताना दिसला.
काय आहे या पाठीमागची पार्श्वभूमी-
हे वाक्य बोलताना जरी धोनीच्या हजरजवाबीपणा पुढे आला असला तरी यापाठीमागे एक मोठी पार्श्वभूमी आहे. गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर असताना जेव्हा धोनी असाच चेंडू घेऊन पेव्हेलियनकडे जाताना दिसला तेव्हा चाहते तसेच मीडियाने धोनीच्या निवृत्तीची चर्चा केली होती.
जेव्हा इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा ८ विकेट्सने पराभव झाला होता आणि धोनी सामना संपल्यावर चेंडू घेऊन मैदानातून परतत होता तेव्हा निवृत्तीची मोठी चर्चा झाली होती.
यानंतर काही दिवसांतच धोनीने आपण २०१९ विश्वचषक खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. “मी चेंडू हातात घेतला होता कारण आम्हाला येथे चांगाल रिवर्स स्विंग मिळाला नाही आणि आम्ही येथे विश्वचषक खेळणार होतो. तेव्हा मला चेंडू पहायचा होता. जर विरोधी संघाला येथे रिवर्स स्विंग मिळत असेल तो आम्हालाही मिळायला हवा. हे खूप महत्त्वाचे होते. त्यामुळे चेंडू पहाणे मला महत्त्वाचे वाटले. ” असे धोनी त्यावेळी म्हणाला होता.
https://twitter.com/lakshayrohilla3/status/1086277286133788681?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1086277286133788681&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-mahendra-singh-dhoni-joke-with-sanjay-bangar-says-ball-le-lo-nhi-to-bolega-retirement-le-raha-video-gone-viral-on-social-media-2367943.html
https://twitter.com/TheYorkerBall/status/1086318327440408576
महत्त्वाच्या बातम्या-
–एमएस धोनीच्या शानदार खेळीने रिकी पॉंटींगचाही विक्रम मोडीत
–टीम इंडियाचा नादच खूळा! कोणत्याही संघाला जमले नाही ते करुन दाखवले
–ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेप्रमाणेच वनडेतही टिम इंडियाने रचला इतिहास