श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील निर्णायक सामना मंगळवारी (5 सप्टेंबर) खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात श्रीलंकेने 2 धावांनी विजय मिळवला आणि सुपर फोरमध्ये जागा पक्की केली. अफगाणिस्तान संघाला विजयासाठी 292 धावा हव्या होत्या, ज्या त्यांना करता आल्या नाहीत. सोबतच सुपर फोरसाठी पात्र ठरण्यासाठी अफगाणिस्तानला 37.1 षटकात विजय मिळवणे गरजेचे होते. पण आता असे समोर येत आहे की, अफगाणिस्तन संघ व्यवस्थापन आणि मुख्य प्रशिक्षकांना याबाबत संपूर्ण माहिती मिळाली नव्हती.
अफगाणिस्तान संघ या सामन्यात 37.4 षटकांमध्ये 289 धावांवर सर्वबाद झाला. अष्टपैलू राशिद खान (Rashid Khan) शेवटपर्यंत खेळपट्टीवर होता, पण नॉन स्ट्रेईकवर असल्यामुळे त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. राशित स्ट्रेईकवर असता, तर संघ 37.1 षटकात विजय मिळवून सुपर फोरसाठी पात्र ठरू शकत होता. सुपर फोरसाठी आवघ्यक असलेला निर्धारित षटकांमधील विजय न मिळाल्यामुळे राशिद खान चांगलाच निराश झाला होता. नॉन स्ट्रेईख एंडवर गुडघ्यांवर सललेला राशिद खान सोशल मीडियावर देखील चांगलाच व्हायरल झाला. 37व्या षटकातील पहिला चेंडू झाल्यानंतर राशिदने सुपर फोरच्या आशा सोडल्या होत्या. पण प्रत्यक्षात संघाकडे असणाऱ्या संधी संपल्या नव्हता.
सुपर फोरमध्ये पोहोचण्यासाठी अफगाणिस्तानला 37.1 षटकात जिंकणे गरजेचे होते. पण ते शक्य न झाल्यास 37.2 षटकात संघ 293 धावा करू शकत होता. सोबतच 37.3 षटकात 294 धावाही करता येऊ शकत होत्या. तसेच 37.5 षटकात 296, तर 38.1 षटकात 297 धावा करून संग सुपर फोरमध्ये आपले स्थान पक्के करू शकत होता. मात्र, याबाबत अफगाणिस्तान संघ व्यवस्थापनाला कुठलीच कल्पना नव्हती. ज्यामुळे संघाला सुपर फोरमध्ये जागा मिळाली नाही.
अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट (Jonathan Trott) याविषयी नाराजी व्यक्त करताना दिसतात. प्रशिक्षक म्हणाले, “त्यांचा संघाला रन रेटचे समीकरण माहीत नव्हते. तो म्हणाला 37.1 षटकानंतर काय समीकरण होते, आम्ही पाहिलेच नाही. अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले यानंतर 295 आणि 297 धावा करून जिंकता येईल. पण आम्हाला याची कल्पना नव्हती की, 38.1 षठकात विजय मिळवता येऊ शकतो.” (Bangladesh did not know the run rate equation? Know what is the whole case)
महत्वाच्या बातम्या –
रोहित बनला वर्ल्डकप खेळणारा भारताचा 8वा कर्णधार, ‘ही’ आहेत इतर 7 नावे
ICC ODI Rankings मध्ये भारताचा हुकमी एक्का शुबमनची हवा! पाकिस्तानी फलंदाजाला पछाडत पटकावला ‘हा’ क्रमांक