---Advertisement---

अरे देवा! श्रीलंकन फलंदाजाने बांगलादेशच्या यष्टीरक्षकाच्या डोक्यात मारली बॅट, पाहा पुढे काय झाले

On: सोमवार, मे 16, 2022 11:06 PM
Batsman-Hit-Wicketkeeper
---Advertisement---

श्रीलंकेचा कसोटी संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका रविवारी (१५ मे) सुरू झाली. पहिला सामना चट्टोग्राममध्ये खेळला जात आहे. पहिल्या डावात श्रीलंका संघासाठी अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस आणि आणि दिनेश चंदीमलने महत्वाचे प्रदर्शन केले. दरम्यान, श्रीलंकेच्या डावात एक अपघात झाला, पण सुदैवाने खेळाडूला कोणती गंभीर दुखापत झाली नाही.

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी स्ट्राईकवरील फलंदाजाकडून यष्टीरक्षकाच्या डोक्यात बॅट लागली, पण नशिबाने त्याला जास्त लागले नाही. श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुनारत्नेने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाने ३९७ धावा करून सर्व विकेट्स गमावल्या.

सामन्याच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेचा वरच्या फळीतील फलंदाज कुसल मेंडिस (Kusal Mendis) खेळपट्टीवर खेळत होता. डावाच्या २४ व्या षटकात बांगलादेशचा ऑफ स्पिनर नईम हसन गोलंदाजीसाठी आला. याच षटकातील एका चेंडूवर मेंडिसने पूल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण घडले काही भलतेच. मेंडिसने हा शॉट मारण्यासाटी बॅट जोरात घुमवली. फिरकी गोलंदाज असल्यामुळे यष्टीरक्षक स्टंपच्या जवळ उभा होता. परंतु मेंडिसच्या हे लक्षातही आले नाही आणि त्याची बॅट जोरात यष्टीरक्षकाच्या डोक्यात लागली.

बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज लिटन दास (Litton Das) सुदैवाने त्यावेळी डोक्यावर हेलमेट घालून यष्टीपाठी उभा होता. अनेकदा यष्टीरक्षक हेलमेट न घालता देखील यष्टीरक्षण करताना दिसत असतात. पण दासचे नशीब चांगले, की या सामन्यात त्याने ही चूक केली नाही. त्याने हेलमेट घातले असल्यामुळे मेंडिसची बॅट जोराने डोक्यात लागल्यानंतर देखील त्याला कोणती गंभीर दुखातप झाल्याचे दिसले नाही. तो काही मिनिटे जमिनीवर झोपून नक्कीच राहिला होता, पण जास्त चिंतेची बाब नव्हती. बॅट दासच्या डोक्यात लागल्यानंतर खेळ काही मिनिटांसाठी थांबवला गेला, पण त्याच्या आवश्यक त्या तपासण्या झाल्यानंतर खेळ पुन्हा सुरू झाला.

दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशला फलंदाजीची संधी मिळाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने एकही विकेट न गमावता ७६ धावा केल्या आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

अरेरे! आधी ९९, आता १९९; अँजेलो मॅथ्यूजच्या नावावर झाला कसोटी क्रिकेटमधील ‘नकोसा’ विश्वविक्रम

हे काय? रोहित-विराट कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्ममध्ये असूनही बीसीसीआय अध्यक्षाला नाही चिंता, म्हणाला…

धक्कादायक! उष्माघातामुळे क्रिकेटरचा मैदानातच मृत्यू, संघाच्या विजयानंतर करत होता सेलिब्रेशन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---