आयपीएलच्या १३ व्या हंगामात बुधवारी(२८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ५ विकेट्सने पराभूत केले. मुंबईच्या या विजयात सुर्यकुमार यादवने तडाखेबंद अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. त्याच्या या खेळीचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे. भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनेही त्याच्या शैलीत खास ट्विट करत सुर्यकुमारचे कौतुक केले आहे.
सुर्यकुमारची मुंबईसाठी विजयी खेळी –
बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मुंबईला १६५ धावांचे विजयासाठी आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सुर्यकुमारने ४३ चेंडूत नाबाद ७९ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि ३ षटकार मारले. त्याच्या खेळीमुळे मुंबईने १९.१ षटकातच १६६ धावा करत सामना ५ विकेट्सने जिंकला.
सेहवाग म्हणाला, बंदे में दम हैं
सुर्यकुमारच्या या खेळीनंतर सेहवागने ट्विट केले की ‘बंदे मै दम हैं. लवकरच नंबर लागेल. सलग ३ ब्लॉकबस्टर हंगाम. सुर्यकुमारची अफलातून खेळी आणि मुंबईचा शानदार विजय.’
Bandey mein hai Dum. Jaldi number aayega no doubt. 3 blockbuster seasons in a row.
Brilliant innings from Suryakumar Yadav and a wonderful win for Mumbai. #MIvsRCB pic.twitter.com/DbvmQPkP9z— Virender Sehwag (@virendersehwag) October 28, 2020
सेहवागचे हे ट्विट पाहिले तर तो सुर्यकुमारची भारतीय संघात लवकरच निवड होईल असे सुचवत असल्याची शक्यता आहे. कारण सुर्यकुमारने सातत्याने चांगले प्रदर्शन करुनही पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात निवड झालेली नाही. याबद्दल निवड समीतीवर सध्या जोरदार टिका होत आहे. तसेच या ट्विटमधून सेहवागने सुर्यकुमारच्या सलग ३ हंगामातील कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सुर्यकुमारने गेल्या ३ आयपीएल हंगामात शानदार कामगिरी केली आहे. त्याने २०१८ ला ३६.५७ च्या सरासरीने ५१२ धावा केल्या होत्या. तर २०१९ ला त्याने ३२.६१ च्या सरासरीने ४२४ धावा केल्या होत्या. तसेच सध्या चालू असलेल्या हंगामात त्याने १२ सामन्यात ४०.२२ च्या सरासरीने ३६२ धावा केल्या आहेत.
देशांतर्गत क्रिकेटमध्येही शानदार कामगिरी –
एवढेच नाही तर सुर्यकुमारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतानाही शानदार कामगिरी केली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ७७ सामन्यात ४४च्या सरासरीने ५३२६ धावा केल्या आहेत. अ दर्जाच्या ९३ सामन्यात त्याने ३५.४६च्या सरासरीने २४४७ धावा केल्या आहेत तर ट्वेंटी-ट्वेंटी प्रकारात त्याने १६१ सामन्यात ३२.१३च्या सरासरीने ३३७४ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“मजबूत राहा आणि संयम ठेव”, भारतीय प्रशिक्षकाचा सूर्यकुमार यादवला सल्ला
भारतीय संघाची जर्सी घालण्यासाठी सुर्यकुमारने अजून काय करायला पाहिजे? माजी क्रिकेटपटू संतापला