---Advertisement---

सहकाऱ्यावर हात उगारल्याने झाली कारवाई; रहीमला ‘इतक्या’ रकमेचा दंड

On: बुधवार, डिसेंबर 16, 2020 10:28 PM
---Advertisement---

बांगलादेशच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेच्या बंगबंधू टी-20 लीग मध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर हात उचलल्यामुळे यष्टीरक्षक मुशफिकुर रहीमवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दंड ठोठावला आहे. बोर्डाने या वर्तणाला पूर्णपणे चुकीचे मानताना रहीमवर कारवाई केली. रहीमच्या सामना मानधनातील 25% रक्कम कापून घेत त्याला इशारा देताना एक डिमेरिट गुण देण्यात आला आहे.

बीसीबीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार म्हणले आहे की, “बीसीबीच्या कोड ऑफ़ कंडक्टचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुशफिकुर रहीमची त्या सामन्यातील 25% मानधन कपात करण्यात आले आहे. त्याने संघातील खेळाडूसोबत अपमानास्पद व्यवहार केला आहे.” मुशफिकुर रहीमला या स्पर्धेत चार किंवा त्यापेक्षा जास्त डिमेरिट गुण देण्यात आले तर त्याला या स्पर्धेसाठी बंदी घातली जावू शकते.

ही घटना बंगबंधू टी-20 स्पर्धेत सोमवारी बेक्सिमेको ढाका आणि फाॅरच्यून बारीशल यांच्या सामन्यात घडली. दोन्ही संघ एलिमिनेटर सामन्यात आमनेसामने आले होते. मुशफिकुर रहीम हा ढाका संघाचा कर्णधार आहे आणि त्याच्या संघाने 9 धावांनी विजय मिळवला. परंतू संघाच्या विजयापेक्षा जास्त कर्णधार आणि संघातील खेळाडूंमध्ये क्षेत्ररक्षण करताना झालेल्या वादाची चर्चा जास्त झाली.

आव्हानाचा बचाव करताना 17 व्या षटकात कर्णधार मुशफिकुर रहीम आपल्या संघातील खेळाडू नसुम अहमद सोबत एका झेलवरुन वाद झाला. बारीशल संघाला 19 चेंडूत 45 धावांची गरज होती. तसे तर रहीमने आपल्या खेळाडूला झेल पकडण्यासाठी कॉल दिला होता की तो झेल रहीम घेईल, मात्र हा झेल नसुमचा होता.
त्यामुळे तो ही झेल पकडण्यासाठी जात होता. जेव्हा रहीमने झेल पकडून नसुमकडे पाहिले तर तो रागाने लाल झाला होता. त्याने झेल घेत राग व्यक्त करताना चेंडूने नसुमला मारण्यासाठी हात उचलला आणि खुप वेळ रागाने ओरडत होता. संघातील इतर खेळाडूने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला.

संबधित बातम्या:
– मुशफीकूर रहीमने उगारला युवा खेळाडूवर हात; व्हिडिओ होतोय व्हायरल
– चुकीसाठी क्षमस्व! संघसहकाऱ्यावर हात उगारल्यानंतर मुशफीकूर रहीमने मागितली माफी
– अरेरे! बांगलादेशचा हा अष्टपैलू खेळाडू बंगबंधू टी२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून बाहेर

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---