आशिया चषकातील सुपर 4 सामन्याला सुरवात होणार आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सुपर-4 चा सामना बुधवारी 6 सप्टेंबरला होणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज दुखापतीमुळे 2023 च्या आशिया चषकमधून बाहेर पडला आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डच्या मते, नजमुल हुसेन शांतो (Najmul Hossain Shanto) बांगलादेशला परतेल आणि पुढच्या महिन्यात भारतात सुरू होणाऱ्या आसीसी वनडो विश्वचषकापूर्वी पुनरागमन करेल. बांगलादेश संघाचे फिजिओ बैजेदुल इस्लाम खान यांनी सांगितले की, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान शांतोला दुखापत झाली. या सामन्यात शांतोने शतक झळकावले होते.
ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नजमुल हुसैन शांतोला हॅमस्ट्रिंगची समस्या आली होती. याच कारणामुळे तो मैदानात उतरला नाही.
बांगलादेश संघाने नजमुल हुसेन शांतोच्या परतण्याची घोषणा केला आहे. तसेच बांगलादेशने शांतोच्या ठिकाणी यष्टिरक्षक फलंदाज लिटन दास (Liton Das) संघात सामील झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात लिटनही प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतो.
2023 च्या आशिया चषकामध्ये शांतो त्याच्या लागली होती. त्याने या स्पर्धेतील दोन सामन्यांमध्ये 96.50 च्या सरासरीने 193 धावा केल्या होत्या. पहिल्या सामन्यात शांतोने 89 धावांची खेळी केली. आणि दुसऱ्या सामन्यात 104 धावा झाल्या.
बांगलादेश सुपर-4 साठी ठरला पात्र
अफगाणिस्तानचा मोठ्या फरकाने पराभव करून बांगलादेश संघाने सुपर-4 मध्ये आपले स्थान पक्के केले होते. बांगलादेशने अफगाणिस्तानवर 89 धावांनी विजय मिळवला. त्या सामन्यात शांतोने 104 धावांची इनिंग खेळली होती. दरम्यान पाकिस्तान संघाने सामन्याच्या एकदिवस आधिच प्लेइंग 11 संघ जाहीर केला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचे प्लेइंग इलेव्हन-
इमाम उल हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि नसीम शाह. (bangaladesh batsman najmul hossian shanto out of asia cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
गुडन्यूज! गुजरात टायटन्सच्या स्टार खेळाडूच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन, पत्नीने दिला लेकीला जन्म
‘सुपर-4च्या’ पहिल्या सामन्यात पाकिस्तान-बांगलादेश आमने-सामने, जाणून घ्या सामन्याबद्दल माहिती