---Advertisement---

‘सुपर-4च्या’ पहिल्या सामन्यात पाकिस्तान-बांगलादेश आमने-सामने, जाणून घ्या सामन्याबद्दल माहिती

PCB vs BNG
---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर-4 सामन्याला आजपासून सुरवात होत आहे. स्पर्धेतील सुपर-4 मध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघानी आपले स्थान मिळवले आहे. यातला पहिला सामना पाकिस्तान आणि बांगालदेश यांच्यात होणार आहे. पाकिस्तान संघाने नेपाळ संघाला 238 धावांनी पराभूत कले होते नंतर भारताविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर बांगलादेश संघाला श्रीलंकेकडून पराभव स्विकारावा लागला. मात्र, दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानला पराभूत केले आणि सुपर-4 मध्ये एंट्री मारली.

आशिया चषक 2023 स्पर्धेचा पहिला सुपर-4 पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश असा होणार आहे. पाकिस्तानातील लहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना दुपारी 3 वाजता चालू होणार आहे. सामना पाहण्यासाठी तुम्ही टीव्ही चॅनेल स्टार स्पोर्ट्स वापरू शकता. त्याचबरोबर तुम्ही हा सामना मोबाईल ऍप डिज्नी प्लस हॉटस्टार मोफत पाहू शकता.

खेळपट्टीचा आढावा
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर धावा करणे खूप सोपे आहे. विकेट सपाट असेल आणि उच्च धावसंख्येचा सामना पाहता येईल. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. या मैदानावर बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्ध प्रथम खेळून 334 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती.

दरम्यान भारतीय संघाने देखिल नेपाळ संघाला 10 विकेटच्या मोठ्या फरकाने पराभूत करून सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे. भारत आणि पाकिस्तान हे आशिया चषकात परत आमने सामन असणार आहेत. 10 तारखेला भारत पाकिस्तान सामना रंगणार आहे. पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला होता. यामुळे सुपर 4 चे सामने स्थलांतरीत करण्यात शक्यता वर्रवली जात आहे. (bangladesh vs pakistan super 4 match asia cup 2023 update)

महत्वाच्या बातम्या- 
सुपर-4 सामन्यासाठी पाकिस्तान संघाची Playing 11 जाहीर, ‘या’ दिग्गज खेळाडूची हाकालपट्टी 
नाद करा पण श्रेयंकाचा कुठं! महिलांच्या CPL स्पर्धेत ‘अशी’ कामगिरी करताच बनली पहिली भारतीय, सर्वांना पछाडलं

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---