---Advertisement---

दुष्काळात तेरावा महिना! बांगलादेशला मोठा धक्का, टी२० विश्वचषकातून शाकिब अल हसन बाहेर

On: रविवार, ऑक्टोबर 31, 2021 10:19 PM
---Advertisement---

संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे सुरु असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत सध्या बांगलादेश संघ संघर्ष करत आहे. त्यातच आता त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक असलेला शाकिब अल हसन स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असल्याचे बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. बांगलादेश या स्पर्धेत सुपर १२ फेरीमध्ये पहिल्या गटात सामील आहे. त्यांचे या फेरीतील दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धचे सामने बाकी आहेत. मात्र, या सामन्यांना क्रिकेटमधील दिग्गज अष्टपैलू म्हणून ओळख मिळवलेला शाकिबला मुकावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ नोव्हेंबरला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ नोव्हेंबरला सामना होणार आहे.

शाकिबला वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना ही दुखापत झाली होती. असे असले तरी त्याने त्या सामन्यात गोलंदाजीदरम्यान त्याच्या ४ षटकाचा कोटा पूर्ण केला होता. तसेच फलंदाजी वेळी त्याने सलामीला फलंदाजी केली होती.

बांगलादेशचे मुख्य फिजिशियन देबाशिष चौधरी म्हणाले, ‘शाकिबला वेस्ट इंडिजविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना डावीकडे खालच्या बाजूला हॅमस्ट्रिंगच्या वेदाना झाल्या आहेत. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला ग्रेड १ ची दुखापत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तो पुढील दोन्ही सामन्यांमधून आणि पुढील तपासणीपर्यंत बाहेर झाला आहे.’

बांगलादेशने शाकिबसाठी कोणत्याही बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. कारण त्यांच्या संघासह कोणताही राखीव खेळाडू नाही. बांगलादेशने सुपर १२साठी पात्रता फेरी खेळून जागा मिळवली होती.

शाकिबने या स्पर्धेत खेळताना आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रमाला गवसणी घातली होती. त्याने हा विक्रम करताना श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाला मागे टाकले होते. शाकिबने ९४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून १८९४ धावा केल्या आहेत आणि ११७ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराटचे सोढीपुढे पुन्हा लोटांगण! टी२० मध्ये ‘इतक्यांदा’ फसवले जाळ्यात

महिंद्रांनी पाळला शब्द! ‘गोल्डन बॉय’ नीरजला भेट दिली ‘स्पेशल XUV700’

कुछ हटके! भारतीय संघाचा अनोख्या पद्धतीने झेल घेण्याच सराव; आयसीसीकडून व्हिडिओ शेअर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---