क्रिकेटपटूंच्या बाबतीत अनेकदा सोशल मीडियावर धमकीवजा कमेंट्स पहायला मिळतात. कधी कोणी चांगला खेळ केला नाही तर, कधी संघ पराभूत झाला तर, अशी विविध कारणे त्यामागे असतात. नुकतीच बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला फेसबुक लाईव्हवर एका धर्मांध व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याने कालीका माता पूजन केल्याबद्दल शाकिबला धमकी दिली आहे.
तो अज्ञात व्यक्ती फेसबुक लाइव्हवर म्हणाला की, शाकिबच्या या वागण्यामुळे मुस्लिम दुखावले गेले आहेत. त्याने चोपरने तुकडे करण्याचीच धमकी शकिबला दिली आहे. या व्यक्तीने सांगितले की, तो सिल्हेट वरून ढाका येथे फिरायला येईल आणि आवश्यक असल्यास शकीबला ठार करेल. कोलकात्यात कालीका माता पूजनाच्या प्रारंभासाठी गेल्याबद्दल त्याने शकीबला धमकावले आहे.
यासंदर्भात सिल्हेट महानगर पोलिस अतिरिक्त उपायुक्त बी. अशरफ उल्ला ताहेर म्हणाले- आम्हाला या प्रकरणाची माहिती मिळाली आहे. व्हिडिओ लिंक सायबर फॉरेन्सिक्स टीमला पाठवण्यात आली आहे. लवकरच कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र, पोलिसांना माहिती मिळताच हा व्यक्ती पुन्हा फेसबुकवर लाइव्ह आला आणि त्याने त्याच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच त्याने शकिबसह सर्व सेलिब्रिटींना ‘योग्य मार्गाचा’ अनुसरण करण्याचा सल्ला दिला.
अशरफ उल्ला ताहेर म्हणाले हा बदनामी आणि जातीय सलोखा नष्ट करण्याचा प्रयत्न होता. दोन्ही व्हिडिओ फेसबुकवरून काढून टाकले आहेत.
शाकिब मागील गुरुवारी(12 नोव्हेंबर) पेट्रापोल सीमेवरून कोलकाता येथे गेला होता आणि बेलाघाट परिसरातील कालीका माता पूजनाचा प्रारंभ सोहळ्यात सहभागी झाला होता. तो मूर्तीसमोर प्रार्थना करताना देखील दिसला. शुक्रवारी तो विमानाने बांगलादेशला परतला.
गेल्या वर्षी 29 ऑक्टोबरला शाकिबला आयसीसी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक वर्षाच्या निलंबनाची शिक्षा सुनावली होती. ही बंदी 29 ऑक्टोबर 2020 रोजी संपली असून तो मैदानात परतणार आहे. शाकीब अल हसनचे भारतात देखील अनेक चाहते आहेत. बांगलादेशला लागूनच असलेल्या भारताच्या कोलकाता राज्याशी त्याचे विशेष नाते आहे. आयपीएल मध्ये कोलकाता नाईट राईडर्ससाठी तो 2011 ते 2017 अशी सात वर्षे खेळला आहे.
पुढे 2018 व 2019 दोन वर्षे तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग बनला होता. 2021 च्या हंगामातून तो पुन्हा आयपीएलमध्ये पुनरागमन करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटऐवजी दुसरा कर्णधार असता तर बेंगलोरने विजेतेपद मिळवले असते का? दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न
ग्रेट कार्ड्स! केएल राहुलने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवर अथिया शेट्टीने दिली प्रतिक्रिया
“आयपीएलमध्ये पूर्ण पैसे मिळावेत म्हणून खेळाडू लपवून ठेवतात दुखापती”
ट्रेंडिंग लेख –
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…