बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार तमिम इक्बाल पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर पडला आहे. दरम्यान आशिया चषक 2023 जवळ आले आहे. बांगलादेश संघाचा कर्णधार कोण? हा प्रश्न असताना बांगलादेश क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष नझमुल हसन यांनी शाकिब अल हसन याला कर्णधार करण्याचे नियोजन केले आहे.
तमिम इक्बालने त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आणि लगेच काही वेळात त्याने आपला निर्णय मागे घेतला. मात्र, त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर बीसीबी अध्यक्ष नझमुल हसन (Nazmul Hassan) यांनी शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याला कर्णधारपदासाठी योग्य मानले आहे. शाकिब सध्या बांगलादेशच्या कसोटी आणि टी20 संघाचा कर्णधार आहे. तसेच याआधी 2011 च्या वनडे विश्वचषकात शाकिबने बांगलादेशचे संघचे नेतृत्व केले होते. आशिया चषकासाठी तमीम उपलब्ध नसल्यास लिटन दास कर्णधार होऊ शकतो, असे संकेत यापूर्वी नजमुल हसनने दिले होते. मात्र, आता तमिमने कर्णधारपद सोडल्यानंतर अनुभवाच्या जोरावर शाकिब कर्णधार होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
बांगलादेशमधील ढाका येथे पत्रकारांशी बोलताना बीसीबी अध्यक्ष हसन म्हणाले, “आम्ही सध्या कर्णधारपदावर चर्चा केलेली नाही. आम्हाला थोडा वेळ घेऊन त्या गोष्टीवर विचार करावा लागेल. आम्ही उपकर्णधार लिटन दासला कर्णधार करु शकलो असतो, पण आता आम्हाला दिर्घकाळाचा विचार करुन निर्णय घ्यावा लागणार आहे.” असे ते म्हणाले.
अध्यक्ष हसन पुढे म्हणाले, “आमच्या पुढे दोन समस्या आहेत. जर आपण दीर्घकालीन विचार केला तर ती एक गोष्ट आहे. पण विश्वचषक देखील अगदी जवळ आला आहे आणि विश्वचषकाचे दडपण खूप मोठे आहे. जर, आम्ही नवा कर्णधार निवडला तर माहित नाही की, तो विश्वचषकाचे दडपण सांभाळू शकेल की नाही. मग आपण याचाही विचार केला पाहिजे. जर आपण एखाद्याला दीर्घकालीन आधारावर निवडले आणि तो एक वर्षानंतर उपलब्ध नसेल तर आपण काय करू? म्हणून आपण या गोष्टींकडे काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे. या गोष्टीची चर्चा केली पाहिजे .”
हसन बोलताना म्हणाले “कर्णधार म्हणून शाकिबला आमची पहिली पसंती आहे, पण तो पुढे दोन वर्षे खेळेल असे वाटत नाही. यामळे आम्हाला त्याची योजना जाणून घेणे आणि बोर्डाशी बोलणे आवश्यक आहे. माझ्या मते सर्वात सोपा पर्याय शाकिबच आहे आणि त्यात काही अडचण नाही.” (bangladesh all rounder shakib al hasan will be the captain of bangladesh in asia cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
आगामी टी20 विश्वचषकाबद्दल रोहितने दिली लक्षवेधी प्रतिक्रिया, म्हणाला..
वर्ल्डकपसाठी पाकिस्तानची तयारी सुरू! ‘या’ खास व्यक्तीला केले पाचारण