---Advertisement---

अनुभवी खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवत बांगलादेशची वर्ल्डकपसाठी संघनिवड; शाकिबकडे नेतृत्व

On: बुधवार, सप्टेंबर 14, 2022 8:19 PM
---Advertisement---

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी बांगलादेशने आपला संघ जाहीर केला आहे. अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन याच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले असून, बऱ्याच अनुभवी खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. आशिया चषकातील खराब कामगिरीनंतर बांगलादेश विश्वचषकात नव्या उमेदीने सहभागी होईल.

बुधवारी (14 सप्टेंबर) जाहीर करण्यात आलेल्या या संघात जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मागील विश्वचषकात संघाचे नेतृत्व केलेल्या महमदुल्लाह याला तसेच अनुभवी सलामीवीर तमिम इक्बालला संधी मिळाली नाही. ‌माजी कर्णधार मुशफिकूर रहीम याने नुकतीच टी20 मधून निवृत्ती घेतल्याने त्याचा संघनिवडीसाठी विचार करण्यात आला नाही.

 

आशिया चषकापूर्वी जखमी झालेल्या लिटन दास, यासिर अली, नुरुल हसन, हसन महमूद आणि नजमुल हुसेन शांतो हे संघात जागा बनवण्यात यशस्वी झाले. मागील विश्वचषकात संघाचा भाग असलेले सौम्य सरकार व शरीफुल इस्लाम यावेळी राखीव खेळाडूंमध्ये दिसतील.

महमदुल्लाह व तमिम इक्बाल यांना संघात न निवडल्याने चाहत्यांनीदेखील निराशा व्यक्त केली आहे. हे दोघेही पहिल्या विश्वचषकापासून संघाचा भाग होते.‌ आता केवळ शाकिब हा एकटाच 2007 विश्वचषकापासून सर्व विश्वचषक खेळणारच एकमेव बांगलादेशी क्रिकेटपटू ठरेल.

विश्वचषकासाठी बांगलादेश संघ-

शकिब अल हसन (कर्णधार), सब्बीर रहमान, मेहदी हसन मिराझ, अफिफ हुसैन, मोसादेक हुसेन, लिटन दास, यासिर अली, नुरुल हसन, मुस्तफिजुर रहमान, सैफुद्दीन, तस्किन अहमद, इबादत हुसेन, हसन महमूद, नजमुल अहमद, नजमुल अहमद .

राखीव खेळाडू- सौम्या सरकार, शरीफुल इस्लाम, रिशाद हुसेन, शक महेदी हसन.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या- 
ऑस्ट्रेलियात रोहित-राहुल अन् पंतची बॅट होते म्यान! आशा फक्त विराटवर; पाहा आकडेवारी
टी-20 विश्वचषकात होणार हर्षल पटेलची धुलाई? पत्रकाराच्या प्रश्नावर गावसकरांचे रोखठोक उत्तर, म्हणाले…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---