---Advertisement---

श्रीलंका दौऱ्यासाठी ‘या’ संघाची झाली घोषणा; संघात २७ खेळाडूंना मिळाली संधी

On: सोमवार, सप्टेंबर 14, 2020 4:05 PM
---Advertisement---

मुंबई ।  आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप अंतर्गत बांगलादेश आणि श्रीलंका संघ यांच्यात ऑक्टोबरमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या कसोटी मालिकेसाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने अर्थात बीसीबीने आपल्या संघाची घोषणा केली आहे. बांगलादेशचे 27 खेळाडू श्रीलंकेच्या दौर्‍यावर जातील.

निवासी शिबिरामध्ये केवळ 20 खेळाडूंचा समावेश असेल

बांगलादेश संघाचे मुख्य निवडकर्ता मिन्हाजुल आबेदीन म्हणाला, “होय, महमूदुल्लाला 27 सदस्यांच्या संभाव्य संघात स्थान देण्यात आले आहे. सरकारची परवानगी मिळाल्यानंतर संघ श्रीलंकेच्या दौर्‍यावर जाईल. हा फक्त एक प्रारंभिक संघ आहे. आम्ही या सर्व खेळाडूंसाठी व्हिसावर काम करत आहोत, पण आम्ही दौर्‍यापूर्वी हॉटेलमध्ये निवासी शिबिरासाठी पोहचू तेव्हा त्यात फक्त 20 क्रिकेटर्स असतील.”

ते म्हणाले, “आम्ही प्रत्येकाला प्राथमिक संघात ठेवत आहोत, कारण आम्हाला काही खेळाडूंना राखीव खेळाडूंमध्ये ठेवणे भाग आहे. सध्याच्या कोरोना परिस्थिती लक्षात घेता राखीव खेळाडूंना ठेवणे खूप महत्वाचे आहे, म्हणून आम्ही सात खेळाडूंना राखीव ठेवण्याचे ठरविले.”

“आम्ही प्राथमिक संघात नऊ वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की, आम्ही अंतिम 20 मध्ये त्या सर्वांची निवड करू. 20 सदस्यीय संघात आम्ही 6 गोलंदाजांसह श्रीलंकेचा दौरा करणार आहोत. श्रीलंकेत गेल्यानंतर आम्ही 17 खेळाडूंची कसोटी मालिकेसाठी निवड करू आणि अन्य तीन क्रिकेटर्सना परत ढाकाला पाठवू,” असेही मिन्हजुल आबेदीन यांनी सांगितले.

श्रीलंका दौर्‍यासाठी निवडलेला बांगलादेशचा 27 सदस्यांचा संघ:

मोमीनुल हक (कर्णधार), तमीम इक्बाल, सदमान इस्लाम, सैफ हसन, इमरुल कायस, सौम्य सरकार, मुश्फिकुर रहीम, मोहम्मद मिथुन, लिंटन दास, नझुल हसन शंतनास, मोसादेक हुसेन, महमूदुल्ला, यासिर अली, नूरन हसन, मेहंदी हसन मिराज, संजमुल  इस्लाम, नईम हसन, मुस्तफिजुर रहमान, रुबेल हुसेन, शफीउल इस्लाम, तस्कीन अहमद, अल अमीन हुसेन, सैफुद्दीन, एबादत हुसेन, अबू जाएद, हसन महमूद.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---