सध्या बांगलादेश संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. पहिला कसोटी सामना रावलपिंडी मैदानावर खेळला गेला. त्यामध्ये बांगलादेशनं 10 गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सध्या दुसरा कसोटी सामना रावलपिंडी मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेश पाकिस्तानला सलग दुसऱ्यांदा घरच्या मैदानावर धूळ चारण्यापासून केवळ 143 धावा दूर आहे.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा संघ पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. खेळाच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात 172 धावांवर डगमगला. पहिल्या डावात पाकिस्तानकडे 12 धावांची आघाडी होती, त्यामुळे बांगलादेशला 185 धावांचे लक्ष्य मिळाले होते. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने लक्ष्याचा पाठलाग करताना एकही विकेट न गमवता 42 धावा केल्या आहेत. बांगलादेशसाठी झाकीर हसन 31 धावा करून खेळपट्टीवर नाबाद आहे, तर शादमान इस्लामने 9 धावा केल्या आहेत.
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी पाकिस्तान संघाने दोन गड्यांच्या मोबदल्यात 9 धावांनी डावाला सुरुवात केली. हसन महमूद आणि नाहिद राणा यांच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात केवळ 172 धावाच करू शकला. आघा सलमानने सर्वाधिक नाबाद 47 धावा केल्या, तर मोहम्मद रिझवानने 43 धावांची खेळी केली. कर्णधार शान मसूदने 28 धावांची तर सॅम अयुबने 20 धावांची खेळी खेळली. बाबर आझम केवळ 11 धावा करू शकला.
दुसरा कसोटी सामना नावावर करण्यासाठी बांगलादेशसमोर विजयासाठी 185 धावांचे लक्ष्य असून, त्याला प्रत्युत्तर देताना बांगलादेशने शानदार सुरुवात केली आहे. बांगलादेशने 7 षटकात एकही गडी न गमावता 42 धावा केल्या आहेत. पावसामुळे तिसऱ्या सत्रात एकच षटक टाकता आले.
बांगलादेश संघ कसोटीमध्ये पाकिस्तानविरुद्ध कधीही जिंकला नव्हता. परंतु, त्यांनी रावलपिंडी मैदानावर पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला आणि ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली. आता कदाचित दुसरा कसोटी सामनाही बांगलादेश जिंकण्याच्या पायरीवर उभा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्याची पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी हुकणार?
“जे विराटला नाही जमलं ते हा खेळाडू करणार”, पहिल्यांदाच RCB ला चॅम्पियन बनवणार..!
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचा डंका! देशाला मिळालं 8वं पदक